घरताज्या घडामोडीदुपारी १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही, मंगलप्रभात लोढांची माहिती

दुपारी १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही, मंगलप्रभात लोढांची माहिती

Subscribe

नवी मुंबईतील खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मात्र, या सोहळ्याला गालबोट लागल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सोहळ्यात लाखो श्रीसदस्य सहभागी झाले होते. मात्र, या सोहळ्यात उष्माघातामुळे आत्तापर्यंत चौदा जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जी घटना घडली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशी घटना घडेल याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. त्या दिवशी जे काही झालं त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये. तसेच कोणाला त्रासही होऊ नये. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. जोपर्यत कडाक्याचं ऊन आणि गरमीची स्थिती आहे. तोपर्यंत १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते आणि पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून खारघर येथील दुर्घटनेला प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. तसेच संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना लोढा म्हणाले की, विरोधकांचे काम आहे राजीनामा मागणे. पण कोणालाही कल्पना नव्हती की, असे काही होईल.


हेही वाचा : पावसाआधीच बळीराजा सुखावणार; राज्य शासन करणार ही मदत…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -