घरमहाराष्ट्रभाजपा नेत्याकडून शिंदेंच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या शौर्याशी, विरोधक आक्रमक

भाजपा नेत्याकडून शिंदेंच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या शौर्याशी, विरोधक आक्रमक

Subscribe

सातारा – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. हा वाद शमत नाही तोवर भाजपाच्याच आणखी एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शौर्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी करण्यात आली आहे. यामुळे भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा आता चांगलेच चर्चेत आले असून त्यांच्यावर चौफेर टीका केली जातेय.

हेही वाचा – सरकार तोंड शिवून बसलंय, शिवप्रताप दिनी ढोंग करतंय; राऊतांचा हल्लाबोल

- Advertisement -

प्रतापगड किल्ल्यावर आज ३६३ वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी गडावर भव्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केली आहे. ‘औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं. पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,’ असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

आगीत तेल ओतण्याचं काम

- Advertisement -

शिवप्रताप दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष शिवाजी महाराजांचा असा अपमान झाल्याने विरोधकांकडून टीका केली जातेय. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले.” असं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

हेही वाचा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे माझ्यावर कारवाई, संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र

आदित्य ठाकरेंचाही निशाणा

मिंधे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाशी करणं चूक आहे. ही तुलना होऊच शकत नाही. हा सगळा महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. शिंदेंची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामध्येच अशा पद्धतीची वक्तव्य येतात, असं युवानेता आदित्य ठाकरे म्हणालेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -