घरताज्या घडामोडीदांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर.., मंगलप्रभात लोढांनी दिलं स्पष्टीकरण

दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर.., मंगलप्रभात लोढांनी दिलं स्पष्टीकरण

Subscribe

नवरात्रोत्सवाची धामधूम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. परंतु दांडिया क्रार्यक्रमांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विश्व हिंदू परिषदेने आधार कार्ड पाहून केवळ हिंदूंना दांडिया कार्यक्रम स्थळी प्रवेशाची परवानगी आयोजकांना द्यावी, अशी भाजप नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
मागणी करत समर्थन केल्याचे सांगितले जात आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गुजरातमध्ये तसे काही प्रकार घडले आहेत. दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम आहे. ज्यांना पूजा करण्यास रस नाही. त्यांनी यायचं की नाही हा एक प्रश्न आहेच. मात्र, याबाबत योग्य ते अधिकारी किंवा आयोजक निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता मंत्री तुमच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. जे घरात बसून होते, ज्यांनी घरात बसूनच सरकार चालवलं. त्यांनी घरात बसून राहिल्यानेच ही वेळ आली आहे, असं लोढा म्हणाले.

आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्या ऑन दि स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देत २५ वर्षांत जे काही पोलिकेत सुरू आहे. त्यानुसार जर कारवाई करायचे ठरवले तर अधिकारी शिल्लक उरणार नाही, असा टोला देखील लोढा यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा : अकोलातील अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; भाजपाचा पराभव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -