‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

Mangesh Desai Meets Car Accident
धर्मवीर सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

‘धर्मवीर’ या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे. सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई हे आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. मात्र समोरच्या कारने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहीती समोर येतेय. दरम्यान सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. या संदर्भात खुद्द मंगेश देसाई यांनी माहिती दिली आहे.( Mangesh Desai Meets Car Accident)

मंगेश देसाई काय म्हणाले?

“कारचा अपघात झाला होती. मात्र या दुर्घटनेत मला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीये. यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. दरम्यान गाडीचे नुकसान झालं आहे. ज्या गाडीने ठोकलं त्या गाडीच्या चालकाच्या मित्राला थोडीशी दुखापत झाली आहे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलयं तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी सुखरुप आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या पाठिशी असताना मला काहीही होऊ शकत नाही. मला किंवा माझ्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची दुखापती झाली नाहीये. मला अनेक फोन आले यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ करुन सविस्तर माहिती देत आहे.” अशी प्रतिक्रिया मंगेश देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे हे कळताच अनेक चाहत्यांचे , निकटवर्तीयांचे फोन येण्यास सुरूवात झाल्याने मंगेश देसाई यांनी व्हिडिओ करत ते सुखरुप असल्याचे सर्वांना सांगितले आहे.

मंगेश देसाई यांनी मराठी सिनेमात प्रचंड योगदान दिलं असून अनेक महत्वपूर्ण सिनेमात त्यांनी काम केलंय. यासह ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाची मंगेश देसाई यांनी निर्मीती केली असून यामध्ये त्यांच्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे.


हे हि वाचा –  ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ