घरमहाराष्ट्रखर्गेना भेटू न दिल्याने माणिकराव गावित 'नाराज'

खर्गेना भेटू न दिल्याने माणिकराव गावित ‘नाराज’

Subscribe

काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे आधीच नाराज असलेल्या माणिकराव गावित यांची नाराजी आणखीनच वाढली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची माणिकराव गावित भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना भेट न दिल्याने आणखीनज नाराज झाले आहेत.

काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे आधीच नाराज असलेल्या माणिकराव गावित यांची नाराजी आणखीनच वाढली असून, आज त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी भेट न दिल्यामुळे गावित नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसने नंदुरबार मतदारसंघात के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. नंदुरबार मतदारसंघातमधून निवडणूक लढवण्यासाठी गावित इच्छुक होते. मात्र काँग्रेसने गावित यांचे तिकीट कापत पाडवी यांना उमेदवारी दिली त्यामुळे गावित नाराज असल्याचे दिसून आले. दरम्यान टिळक भवन येथे उपस्थित असलेल्या पक्षाच्या इतर नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला.

नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही

माणिकराव गावित हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्या जागी के. सी. पाडावी यांना तिकीट दिल्याने ते नाराज आहेत. मात्र मुलाला तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या गावितांनी नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

वाचा – रावेरमधून काँग्रेसच्या पाटील यांना उमेदवारी; गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वाचा – भाजपविरोधात मतदान करा; फिल्ममेकर्सचे आवाहन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -