Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Manipur Violence : '9 वर्षांत काय केलं ते सांगा, 30 वर्षांपूर्वीचं सांगू...

Manipur Violence : ‘9 वर्षांत काय केलं ते सांगा, 30 वर्षांपूर्वीचं सांगू नका’; पवारांनी भाजपला सुनावलं

Subscribe

मणिपूरला भाजपचं राज्य आहे. काँग्रेसने चांगलं काम केलं नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला 9 वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

नुकतचं संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. हे अधिवेशन मणिपुरच्या मुद्द्यावरून प्रचंड गाजलं. विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर टीका करत त्यांनी मणिपूरविषयी प्रश्न विचारत भाजपला धारेवर धरलं आहे. ( Manipur Violence Tell us what happened in 9 years Sharad Pawar question to BJP over Manipur riots )

शरद पवार म्हणाले की, मणिपूर हा विषय मणिपूरपर्यंत मर्यादित नाही. पूर्व पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट आहे. आम्ही संसदेत हा विषय मांडला. पण यावर चर्चा होऊ दिली नाही. आम्ही एका कलमाखाली चर्चेची मागणी केली. ती पूर्ण केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत मणिपूरवर बोलले. पण ते मणिपूरवर अत्यंत कमी वेळात बोलले. मणिपूरच्या लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती. ते काहीच दिसंल नाही. त्यांच्या भाषणात त्याचा अभाव होता. त्यातून काही पदरात पडलं नाही, असं पवार म्हणाले.

तुम्ही काय दिवे लावले?

- Advertisement -

तुमच्या हातात नऊ वर्ष राज्य आहे. नऊ वर्षात तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही 30 वर्षांपूर्वी काय झालं सांगता. 30 वर्षांपूर्वीचं वर्किंग असतं. ते संपलं. आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मणिपूरला भाजपचं राज्य आहे. काँग्रेसने चांगलं काम केलं नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला 9 वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

( हेही वाचा: ‘कार्यकर्ते लढणार आणि तुम्ही नाती सांभाळणार’; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं )

पक्षात फूट का पडली? पवारांचं उत्तर

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलं आहे. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांवर नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील, असं सांगतानाच कालच्या बैठकती ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचं, शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

वंचितशी चर्चा नाही

यावेळी त्यांनी वंचित सोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. आमची काही वंचितशी चर्चा झाली नाही. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित चर्चा झाली आहे. त्याबाहेर आम्ही गेलो नाही, असंही ते म्हणाले.

 

- Advertisment -