Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, ते पंतप्रधानांचीही तक्रार करतील; शिवसेनेचा पलटवार

भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, ते पंतप्रधानांचीही तक्रार करतील; शिवसेनेचा पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये काय चुकलंय?

Related Story

- Advertisement -

परप्रांतीयांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भातखळकरांच्या तक्रारीवर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी भातखळकरांचे डोकं ठिकाणावर नसल्याचे विधान केलं आहे. भातखळकर उद्या कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तक्रार करतील असे टीकास्त्र मनीषा कायंदे यांनी अतुल भातखळकर यांच्यावर डागलं आहे. केंद्र सरकारनेच सर्व राज्यांना कामागारांची नोंदणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. महिला सुरक्षा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असल्याचे मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

शिवसेने नेत्या मनीषा कायंदेंनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत भातखळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर हे समता नगर पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी गेले असल्याचे समजते आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षेबाबत सर्व मुख्य पोलिसांची बैठक घेतली होती. या बैठकीत महिला सुरक्षेच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. काय योजना करता येतील त्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक विचार सर्वांसमोर मांडला या विचाराला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे परप्रांतीय मग ते कोणत्याही राज्याचे असो त्यांची नोंदणी झाली पाहिजे. कर्नाटक, गोवा या राज्यात जाणाऱ्या कामगारांची नोंदणी होत आहे. अशा सुचनाच केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाठवल्या असल्याचे मनीषा कायंदे यांनी सांगितल आहे.

भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही

- Advertisement -

कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार होते. ते आपापल्या राज्यात गेले त्यावेळी देखील हा प्रश्न ऐरणीवर आला होता आता तोच प्रश्न वेगळ्या संदर्भात महिला सुरक्षेचे लक्षात घेऊन जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये काय चुकलंय? अतुल भातखळकर यांचे डोकं ठिकाणावर नाही आहे. हे मी स्पष्ट सांगत आहे. त्यांचे नेते काहीही बोलत असतात, त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन देत आम्हाला काही फरक पडत नाही. पोलीसच त्यांना प्रत्युत्तर देतील असे मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात भातखळकरांची तक्रार

- Advertisement -

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, दोन समजामध्ये भीती पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतीय फौजदारी दंड संहितेच्या कलम १५३ प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खटला दाखल करावा अशी मागणी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढीच विचारणा आहे की, मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावणारे धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांताचे आहेत. कदाचित काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सहाकारी झाल्यामुळे त्यांना अस वाटत असेल बलात्कार, हत्या, दरोडे हे रोहिंग्या, मुस्लिम करता. बांग्लादेशी घुसखोर करतात ते सांगायला विसरले कारण त्यांना खुर्ची स्वतःची प्रिय आहे. त्याच्यामुळे या घटनाविरोधी कृत्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : परप्रांतीय मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांविरोधात अतुल भातखळकरांची तक्रार, पोलिसांना ४ दिवसांचे अल्टिमेटम


 

- Advertisement -