घरमहाराष्ट्रमनिषा म्हैसकर यांची बदली, एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनिषा म्हैसकर यांची बदली, एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदलांचा सपाटा गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आला. फडणवीस यांच्या मर्जीतील ओळखल्या जाणाऱ्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची बदली आता थेट प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार पदी करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी मंत्रालयात म्हैसकर यांना साईड पोस्टिंग देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, म्हैस्कर यांच्याप्रमाणेच एकूण ९ अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने मीरा भाईदंरच्या आयुक्तपदी सी. के. डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर बदल्यांचा सपाटा

महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपला मंत्रीमंडळ विस्तार पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरु केला आहे. पहिल्या फेरीत अनेक महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार गुरुवारी एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांना मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव एम. डी. पाठक यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-२ या पदावर केली असून शिर्डी येथील साईबाबा विश्वस्त संस्थेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगळीकर यांना परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

सी. के. डांगे मिरा-भाईंदर आयुक्तपदी

व्ही. एन. सूर्यवंशी यांची बदली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली पुणे येथील पशु संवर्धन विभागाच्या आयुक्तपदी केली असून मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सी. के. डांगे यांना मिरा-भार्इंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम. देवेन्द्र सिंह यांची बदली यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावर करण्यात आली आहे. तर परभणीचे जिल्हाधिकारी शिवा शंकर यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -