घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप एकत्र येणार? बघा नीलम गोऱ्हे काय म्हणताय?

शिवसेना-भाजप एकत्र येणार? बघा नीलम गोऱ्हे काय म्हणताय?

Subscribe

‘शिवसेना आणि भाजप पक्ष केव्हाही एकत्र येतील’, असे खळबळजनक विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मंगळवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मनोहर जोशी यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ‘एएनआय’ वृतसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीत आहे. त्यांच्या भूमिकेचा पक्षाशी काहीही संबंध नाही आणि ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी दिले. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम लगला, असे मानायला हरकत नाही.

- Advertisement -

काय म्हणाले होते मनोहर जोशी?

‘आता असे वाटते की छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडे सहन करावे, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहाने सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचे ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मते गोळा करण्याच्या निमित्ताने, पक्ष विस्ताराच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपाच्याबाबतीत झाले आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असे नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे’, असे मनोहर जोशी म्हणाले होते. यावर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिले. ‘जोशी यांची ही वैयक्तीक भूमिका आहे. मनोहर जोशींची भूमिका पक्षाची अधिकृत भुमिका नाही. शिवाय त्यांच्या पिढीच्या नेत्यांमध्ये अशाप्रकारच्या भावना असणे स्वाभाविक आहे’, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.


हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -