घरमहाराष्ट्रमाझ्या अंदाजे हा 'राफेल'चा पहिला बळी गेला - आव्हाड

माझ्या अंदाजे हा ‘राफेल’चा पहिला बळी गेला – आव्हाड

Subscribe

'माझ्या अंदाजे 'हा' राफेलचा पहिला बळी गेला', असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केले होते. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एकीकडे हळहळ व्यक्त होत असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ‘माझ्या अंदाजे ‘हा’ राफेलचा पहिला बळी गेला’, असे विधान करत त्यांनी वादाचा धुरळा उडवून दिला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून टिकेची झोड उठल्यानंतर ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला’, असल्याचे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण

शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री असताना चार वेळा सर्जिकल झाला होता. मात्र, त्याचा कधीही गवगवा केला नाही, असे सांगताच सरकारकडून राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने मनोहर पर्रीकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असताना आव्हाड यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आव्हाड?

मी ४ ते ५ वेळा त्यांना भेटलो होतो. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. पण, माझे असे वैयक्तिक मत आहे की, राफेलची बोलणी सुरू असताना अस्वस्थ असलेल्या पर्रीकरांनी दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही, हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले, ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांसोबत बोलून दाखवल्या होत्या. आता, मरणानंतर कोणावर बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी गेला’, असे आव्हाड म्हणाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते.


वाचा – Video : ‘संजू वर्मा’ या भाजपच्या बेशरम प्रवक्ता – जितेंद्र आव्हाड

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांचा खुलासा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी असल्याची प्रतिक्रिया देणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नंतर आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले. मात्र, पर्रीकरांच्या नावाचा उल्लेखही कोणी केला नाही. यावरुनच त्यांच्या सच्चाईची आणि सचोटीची ओळख पटते. मात्र, हा तणावच त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत गेला. हा तणावच त्यांच्या शरीराला मारक ठरला आणि त्यांना देवाज्ञा झाली. एका प्रामाणिक राजकारणी व्यक्तिमत्वाला देश मुकला, असा खुलासा करणारी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.


वाचा – जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, ‘परत एकदा महाराष्ट्र पेटवणार’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -