घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरManoj Jarange : तो काही तुझा पणजोबा नाही; जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका

Manoj Jarange : तो काही तुझा पणजोबा नाही; जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका

Subscribe

20 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विशेष अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी विधेयक संमत झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, जरांगे पाटील हे धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. त्यांना लगाम घालणार आहात की नाही, असा सवाल भुजबळ यांनी राज्य सरकारला केला.

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथून पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी जरांगेंनी कुणाचेच नाव न घेता येथे बसलेला एकजण त्याला सगळी माहिती पुरवतो, तो काही तुझा पणजोबा नाही असे म्हटले. तेव्हा जरांगेंचा रोख कुणाकडे आहे असा प्रश्न पडला होता. दरम्यान यानंतर अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषदेतून जरांगेंवर हल्लाबोल केला. तेव्हा जरांगेंनी केलेला तो उल्लेख बारसकर यांच्याकडेच होता हे यातून स्पष्ट झाले. (Manoj Jarange He is not your great grandfather Jarange indirect criticism of Bhujbal)

20 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विशेष अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी विधेयक संमत झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, जरांगे पाटील हे धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. त्यांना लगाम घालणार आहात की नाही, असा सवाल भुजबळ यांनी राज्य सरकारला केला. भुजबळांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाहीये आणि तिकडे तो येवल्याचा नेता वाट्टेल ते बडबडतोय. तो म्हणे मनोज जरांगे गोधडीत आत मोबाइलमध्ये काय बघतो ते माहिती आहे. अरे, तुला काय माहिती मी आत काय बघतो. मो गोधडीत मोबाइलमध्ये काय बघतोय हे त्याला कोण सांगते, ते मला माहिती आहे. मी त्याला शोधून काढलं आहे. हा घातपाताचा प्रकार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra : अतिक्रमण धारकांवर पोलिसांकडून अश्रुधूराच्या नळकांड्या; कुठे घडला प्रकार वाचा?

आमचंच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो. मी त्याला एवढंच सांगेन की, त्याने असं काही करू नये. येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलंय. पण मी त्या गद्दाराला सांगेन की, मराठ्यांशी बेईमानी करू नको. मी आत्ता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतोय. रोज आमच्याबरोबर उठतो-बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतीष्ठा मिळाली आहे. मी त्या गद्दाराला सांगेन की तू त्याला (छगन भुजबळ) काही सांगू नको. तो काही तुझा पणजोबा नाही. इथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे, त्याच्यासाठी काहीतरी कर असे म्हणत भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

लगेचच बारसकर मीडियासमोर येऊन जरांगेवर आरोप

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यभर रास्तारोको आंदोलनांची हाक दिली आहे. जरांगेच्या या घोषणेला काही वेळ जात नाही तोच मराठा आंदोलनात सहभागी झालेले अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठी जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर जेसीबीतून फुले उधळणारे लोक आले कोठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -