घरमहाराष्ट्रManoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला - नरेंद्र...

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला – नरेंद्र पाटील

Subscribe

शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे मनोज जरांगेंनी करू नये, असे आवाहनही गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला आहे, अशी टीका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना अचानक माईक ठेवला आणि उठून सागर बंगल्या म्हणजे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी अंतरवाली साराटी येथून निघाले आहेत. यावेळी अनेक मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे अंतरवाली सराटी येथे एकच गोंधळ पाहायला मिळाला.

नरेंद्र पाटील म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला असून त्यांचा बोलवता धणी कोण आहे. मनोज जरांगे हे वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. फडणवीसांनी आण्णासाहेब पाटील मंडळ जीवंत करून हजारो मराठा तरुणांना उद्योगासाठी मदत केली आहे. त्याचबरोबर सारथी मधून मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील हे खालच्या पातळीवर बोलत आहे. यामुळे मनोज जरांगे हे वेगळ्या आणि राजकीय दिशेने जात असल्याचे बोलत आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : मनोज जरांगेंनंतर देवेंद्र फडणवीसही मुंबईच्या दिशेने रवाना

मनोज जरांगेंना गैरसमज झाले; सुजय विखे

मनोज जरांगे पाटील हे आक्रमक होत अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. यावर बोलताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगेंना काही गैरसमज झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत शासनाने कायदा पारित करुन 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. मराठा समाजाच्या अजून काही मागण्या असतील तर त्यांनी त्या चर्चेच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजेत. चुकीच्या माहितीची मनोज जरांगेंनी शहानिशा करावी. मराठा समाज संयम दाखवला, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर दिली आहे.

- Advertisement -

जातीय द्वेषातून अशांतता निर्माण करणे – सदावर्ते 

मनोज जरांगे महाराष्ट्राला अशांत करण्याच्या भानगडी करत आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपावरून केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु जातीय द्वेषातून अशांतता निर्माण करणे आणि त्याचबरोबर सामान्यांच्या आयुष्यासोबत खेळणे या गोष्टी संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार हे प्रतिबंधात्मक आहे”, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा – Bacchu Kadu : एका व्यक्तीवरील आरोपाने आंदोलनाची दिशा…; बच्चू कडूंकडून जरांगेंना विनंती

शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे मनोज जरांगेंनी करू नये, असे आवाहनही गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे. जरांगे न्यायालयात येऊन ज्या पद्धतीने खोटे बलत होते. त्यावरून तो व्यक्ती किती ढोंगी आणि भूलथापा मारणार आहे, हे समजते. आज मनोज जरांगेच्या वागण्यावरून तो कशा पद्धतीची नौटंकी करू शकतो हे दिसत आहे, असा टोला गुणरत्न सदावर्तेंनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -