घरमहाराष्ट्रMaratha Reservation: 15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा सुरू करणार; असा असणार...

Maratha Reservation: 15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा सुरू करणार; असा असणार दौरा

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. राज्यातील सर्व मराठा एकजूट व्हावा यासाठी हा दौरा केला जाणार आहे. 

जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. राज्यातील सर्व मराठा एकजूट व्हावा यासाठी हा दौरा केला जाणार आहे.  हा दौरा 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.  (Manoj Jarange Patil going to tour Maharashtra will start from November 15 to 23 november)

‘असा’ असेल दौरा

- Advertisement -
  • 15 नोव्हेंबर- वाशी, परांडा, करमळा
  • 16 नोव्हेंबर – दौंड, मायनी
  • 17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर कराड
  • 18 नोव्हेंबर-  सातारा, मेंढा, वाई, रायगड
  • 19 नोव्हेंबर – रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड दर्शन, मुळशी, आनंदी
  • 20 नोव्हेंबर – तुळापूर, खराडी , पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण
  • 21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर
  • 22 नोव्हेंबर – विश्रांत गड,. संगमनेर, श्रीरामपूर
  • 23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई, आंतरवाली

चौथ्या टप्प्यात विदर्भ, तसंच मराठवाडा आणि कोकण अशा टप्प्यांमध्ये पुढचा दौरा असणार आहे. तसंच, यावेळी त्यांनी मराठा समाला आवाहन केलं आहे की, कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नये.

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजातील लोक अजूनही साखळी उपोषण करत आहेत. पण, तसं असलं तरीही 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावाने साखळी उपोषण सुरू करावे, त्याची तयारी आता सुरू करावी. यावेळी जरांगे पाटलांनी हे अधोरेखित केलं की, मराठा समाज दौऱ्यांसाठी कोणाकडूनही पैसे घेत नाही. कोणी तुमच्याकडून पैसे मागितले तर देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

- Advertisement -

24 डिसेंबरसाठी तुमची आवश्यकता 

आता आरक्षण मिळायला लागलं आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील बांधव आत्महत्या का करत आहेत?  त्यांना माझी विनंती आहे. आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरला मला तुमची गरज आहे. 24 तारीख ही मराठ्यांच्या जीवनातील प्रकाश आहे. घरातल्या प्रत्येकाने, समाजातील प्रत्येकाने एकजूट राहा. आपण आरक्षण घेऊनच राहणार असंही  जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 5 ते 6 कोटी मराठ्यांनी एकत्र लढा लढवून जिंकायचा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

(हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -