घरमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, पुन्हा दिला सरकारला इशारा

मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, पुन्हा दिला सरकारला इशारा

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी मराठा समाजाने सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यातील मराठा बांधवांना भेटणार आहेत.

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी मराठा समाजाने सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यातील मराठा बांधवांना भेटणार आहेत. आज (ता. 15 नोव्हेंबर) जरांगे पाटलांनी बीड येथील पाली गावाला भेट दिली. यावेळी मोठ्या जल्लोषात फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरक्षण द्या अन्यथा आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशाराच जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil Maharashtra tour begins, again warned the government)

हेही वाचा – ‘मनोज’ नाव असलेल्या व्यक्तीला स्पेशल ऑफर; ‘या’ हॉटेलचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा

- Advertisement -

यावेळी मराठा समाजासमोर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही. त्यांनी काहीही म्हटले तरी आम्हाला काहीच देणघेण नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण आरक्षण घेईपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आणि आरक्षण मिळवणार. तर, सरकारने जागे व्हावे आणि मराठा समाजाला त्याच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे. राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. कारण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार. मी समाजाचा लेकरू असून, त्यांच्यासाठी लढत आहे. आता नोंदी मिळत असून, मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळणार आहे, असा विश्वासही यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच, मराठा समाज सगळे कामं सोडून फक्त आता आरक्षणासाठी वेळ देत आहे. तर, आम्ही देखील सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोतच. यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येत आहे. ठिकठिकाणी लोकं थांबवून जे काही स्वागत करत आहेत, ती वेदना आहे मराठा समाजाची. जेसीबी लावून अंगावर फुले टाकण्याचे मी सांगितले नाही, पण समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आमच्या लेकरांना न्याय मिळणार आहे. म्हणून हातातील सगळे कामे सोडून समाज आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येत आहेत, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मी या समाजाचा मुलगा आहे, त्यामुळे ते आपल्या लेकरावर प्रेम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार आता कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या आहेत. मी काही उपकार केले नसून, मुलगा म्हणून आपल्या समाजासाठी प्रयत्न करत आहे. माझे हे कर्तव्य होते आणि तेच पार पाडत आहे. मराठा समाजाने जरी मला नेते म्हणून स्वीकारले असेल, पण मी स्वतःला कधीच नेता मानत नाही. मी फक्त सेवक आहे. नोंदी मिळाल्यापासून समाजात उत्साहाचे वातावरण असून, सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आनंद आहे. तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे काम झाले, असा थेट आरोपही मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -