घरमहाराष्ट्रमनोज जरांगेंचा खटाटोप राजकीय फायद्यासाठी, विजय वडेट्टीवारांचा थेट आरोप

मनोज जरांगेंचा खटाटोप राजकीय फायद्यासाठी, विजय वडेट्टीवारांचा थेट आरोप

Subscribe

मनोज जरांगे यांना EWS मधील 10 टक्के आरक्षणातून होणाऱ्या फायद्यापेक्षा ओबीसीमधून काही टक्के मिळणाऱ्या राजकीय फायदा हवा आहे, असा थेट आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश हा ओबीसीमध्ये करून घेण्यात यावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून थेट विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट केले तर याचा फायदा कोणालाही होणार नाही. तर या मागणीविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा आता ओबीसी नेत्यांकडून देण्यात आला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येणारा हट्ट हा इतर कोणत्याही फायद्यासाठी नसून तो राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे. (Manoj Jarange patil rant for political gain, Vijay Wadettiwar’s direct accusation)

हेही वाचा – सरकारने वेगाने आरक्षणाचं काम करावं,ओबीसीतूनच आरक्षण द्यावं; जरांगे पाटील मागणीवर ठाम

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठ्यांना ओबीसीऐवजी EWSमधून आरक्षण देण्यात यावे, ही भूमिका मी आधीच मांडली होती. सध्या ओबीसी, एससी, आणि एसटी समाजाची संख्या ही 75 ते 80 टक्के इतकी आहे. उरलेल्या 20 टक्क्यांमध्ये मराठा, शीख, जैन, मारवाडी, गुजराती आणि ब्राह्मण यांचा समावेस होतो. यांतील शीख कधीही आरक्षण घेत नाही. मारवाडी, गुजराती, जैन हे नोकरीच्या फंद्यात न पडता ते त्यांच्या व्यवसायामध्ये लक्ष देतात. त्यामुळे उरला कोण तर मराठा समाज उरला. त्यामुळे मराठा समाजाला जर का EWS मध्ये आरक्षण मिळाले तर त्याचा त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो, असे वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले.

परंतु, मनोज जरांगे यांना EWS मधील 10 टक्के आरक्षणातून होणाऱ्या फायद्यापेक्षा ओबीसीमधून काही टक्के मिळणाऱ्या राजकीय फायदा हवा आहे. जरांगेंची इतर कोणत्याही फायद्यापेक्षा राजकीय फायदा होण्याची अधिक मनीषा आहे. यामुळे मराठा समाजाच्या तरुणांचे भले होणार नाही, पण तरी ते आग्रही असल्याचा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे. तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर दोन वर्ष हे प्रकरण शांत झाले होते. पण आता आंदोलनावर गोळीबार झाल्यानंतर जरांगे पाटील हे मराठा समाजाचे हीरो म्हणून पुढे आले. त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हम झुका सकते है, असा त्यांचा गर्व झाला आहे. ज्यामुळे आता ते सरकारला धमक्या देत आहेत. आम्हालाही रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा धमक्या देत आहेत. मुळात धमक्या देऊन प्रश्न सुटणार आहेत का?, अशा प्रश्नही वडेट्टीवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -