घरमहाराष्ट्रManoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून राजकरण देखील तापल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी मोनज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. आता ते महाराष्ट्र दौऱ्य करत आहेत. मराठा आरक्षणावरून राज्यातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

छगन भुजबळ आणि मोनज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगलेली दिसत असताना राज ठाकरे यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाणे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मोनज जरांगे पाटील पाटलांच्या आंदोलनाबाबत भाष्य केले.

- Advertisement -

हेही वाचा… Manoj Jarange : कडाक्याच्या थंडीत वांगी येथे जरांगे पाटील यांची विराट सभा

राज ठाकरे यांची जरांगे पाटील यांच्या वर टीका

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल (गुरूवारी) ठाणे दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुका तसेच पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक घेतली. यावळी जरांगे पटील यांच्या वर टीका देखील केली. कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट जरांगे-पाटील यांना भेटल्यावर सांगितली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे कोण आहे? त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पाहवं लागेल. येणाऱ्या काळात ते कळेल. आरक्षणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील कायदा-सुव्यवस्था भंग करायची कुणी ठरवली आहे का? निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी सुरू झाल्या आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा… Raj Thackeray : मनोज जरांगेंना लिहिलेल्या पत्रातून राज ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्यव्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या मागे फक्त आमचा समाज आहे. दुसरं कोणी नाही. जर आमच्या मागे कोणी असेल तर त्यांनी ते शोधून द्यावं. राज ठाकरे यांचा सल्ला आधी योग्य होता. मात्र आता आम्हाला आमचे पुरावे सापडले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार यामधअये काही शंका नाही. जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे, म्हणले की पहिले ते आमच्या पाठिशी ठाम होते. आता आमच्या गोर गरिबांचं कल्याण होणाह आहे. त्यांनी मराठा समाज्यातील लेकरांच्या पाठिशी पाठिंबा म्हणून ठाम राहावं. अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -