घरमहाराष्ट्रछगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले - "धमक्या देऊ नका."

छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – “धमक्या देऊ नका.”

Subscribe

छगन भुजबळ यांच्या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ते आता खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत. त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना यापुढे महत्त्व देणार नाही, असा टोला जरांगे पाटील यांच्याकडून लगावण्यात आला आहे.

सांगली : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज (ता. 17 नोव्हेंबर) ओबीसी समाजाची आरक्षण वाचविण्यासाठी महाएल्गार सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून ओबीसी नेते आणि सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. जरांगेंचा एकेरी उल्लेख करत कोणाचे खाता कोणाचे खाता? असे म्हणतो, पण तुझे खातो काय रे? तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे, असा सल्ला भुजबळांकडून देण्यात आला आहे. परंतु, त्यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ते आता खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत. त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना यापुढे महत्त्व देणार नाही, असा टोला जरांगे पाटील यांच्याकडून लगावण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil response to Chhagan Bhujbal’s criticism)

हेही वाचा – राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवले; भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात खळबळजनक दावा

- Advertisement -

सांगली येथून प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांचे आता वय झाले आहे. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणारच. तशा नोंदी सापडत असल्याने ओबीसी देखील मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्या, असे सांगत आहेत. पण भुजबळ यांना मी मुरब्बी नेता समजत होतो. पण त्यांची वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीची आहेत. मराठा त्यांचा दर्जा घसरु देणार नाही. आपले पण शिक्षण झाले आहे. त्यामुळे काय बोलावे आणि आरक्षणाच्या मुद्यावर काय मांडावे हे कळते, असे जरांगे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

तसेच, दंगली घडवण्याची भाषा करु नये. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. तुम्ही शेपटावर पाय न देण्याची भाषा करत आहात. पण तुम्ही आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर मराठा काय करू शकतो हे दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाचे पुरावे उपलब्ध होत आहे. त्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का तर लागलाच आहे. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण घेणारच आहोत. कसे मिळत नाही, हे ही आम्ही पाहतो. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असा इशाराही जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -