घरमहाराष्ट्रManoj Jarange : पाच महिन्यांनी मनोज जरांगे घरी परतले, पत्नीने औक्षण करुन...

Manoj Jarange : पाच महिन्यांनी मनोज जरांगे घरी परतले, पत्नीने औक्षण करुन केले स्वागत

Subscribe

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा जरांगेंना दिल्यानंतर जरांगेंनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. या यशस्वी लढ्यानंतर मनोज जरांगे पाटीले हे तब्बल पाच महिन्यानंतर त्यांच्या घरी परतले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही, असा पण जरांगेंनी घेतला होता. त्यामुळे हा लढा यशस्वी झाल्यानंतर आज (ता. 01 फेब्रुवारी) आपल्या घरी परतले. यावेळी त्यांची पत्नी सौमित्रा यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. (Manoj Jarange Patil returned home after five months)

हेही वाचा… Election 2024 : महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 जागांवर ठरलं; मात्र ‘या’ 14 जागांचा तिढा कायम

- Advertisement -

सप्टेंबर महिन्यापासून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली होती. आमरण उपोषण, आंदोलन अशा अनेक कठीण पायऱ्या पार करत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची शपथ जरांगे यांनी घेतली होती. त्यांनी ही शपथ पूर्ण करत समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोहचले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिकाही जरांगे यांनी घेतली होती. त्यांची ही भूमिका कायमच त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली. ज्यामुळे त्यांच्या या आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाले. जरांगे घरी परतले, त्यावेळी परिसरात नागरिकांकडून जल्लोष करण्यात आला.

घरी परतल्यानंतर जरांगे यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की, मी घरी दोन दिवसांचा पाहुणा म्हणून आलो आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपला लढा सुरू राहणार आहे. संपूर्ण समाजाने मला कुटुंबासारखे प्रेम दिले. त्यामुळे मला कुटुंबाची आठवण आली नाही. पण जोपर्यंत कायदा होऊन त्या कायद्याअंतर्गत एका तरी व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे, असे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले. तर, पुन्हा 10 फेब्रवारीपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याचेही जरांगेंकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर देखील शंका असल्याचे सांगत जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -