घरमहाराष्ट्रManoj Jarange : कडाक्याच्या थंडीत वांगी येथे जरांगे पाटील यांची विराट सभा

Manoj Jarange : कडाक्याच्या थंडीत वांगी येथे जरांगे पाटील यांची विराट सभा

Subscribe

सोलापूर: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले, विविध ठिकाणी सभा घेत आहे. करमाळा तालुक्यातील वांगी येथे आज गुरूवारी (ता. 16 नोव्हेंबर) पहाटे चार वाजता सभा पार पडली. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्याासाठी जरांगे पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे वांगी येथे संध्याकाळी पार पडणारी सभा गुरूवारी पहाटे 4 वाजता पार पडली.

हेही वाचा – अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

- Advertisement -

जरांगे पाटील यांची आज पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत सभा पार पडली. कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने पुरूष, महिला, लहान मुलेही जरांगे पाटील यांना एकण्यासाठी वाट पाहत थांबले होते. अनेक भागातून मराठा बांधव सभेसाठी जमले होते. जवळपास लाखाच्या आसपास मराठा बांधव जमले होते. मात्र जरांगे पाटील यांना इंदापुर येथे पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि पहाटे 4 वाजता सभेसाठी पोहोचले.

सभेच्या ठिकाणी ते चार ते पाच मिनीटे बोलले. त्यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिल. तुमचं जे प्रेम आहे ते कधी विसरणार नाही, करमाळ्याची सभा कायस्वरूपी आठवणीत राहील. पहाटेपर्यंत थांबलेल्या मराठा समाजाला पाहून जरांगे पाटील भावुक झाले. आरक्षण मिळाल्यावर तुमचे ऋण कधीही विसरणार नाही, अशा शब्दात जरांने पाटील यांनी उपस्थित असणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.

- Advertisement -

आज सातारा जिल्ह्यात त्यांच्या खटाव आणि मायणी या ठिकाणी दोन सभा होणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या वरवंड या गावात जरांगे यांची संध्याकाळच्या सुमारास मोठी सभा पार पडेल. जरांगे पटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या (ता. 17 नोव्हेंबर) शुक्रवारी सांगली जिल्ह्यात जरांगे पाटील तीन सभा घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता विटा येथे पहिली सभा पार पडेल. त्यानंतर नियोजित वेळेनुसार त्यांचे सकाळी 11 वाजता सांगली शहरात आगमन होईल. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे सभा करून ते कऱ्हाडला रवाना होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -