ठाणे : जिथे मराठा समाज आहे, तिथे समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो. बालेकिल्याचा प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा आहे. क्रिकेट रात्रभर चालते, गोरगरीबांच्या मुलांचा प्रश्न आला की गुन्हे दाखल करतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर दाखल केलेल्या गुन्हेंवरून केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत आहे, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील मराठा समाजचा आशिर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जात आहोत. आम्ही शक्तीप्रदर्शन करत नाही आणि जनजागृती ही केली पाहिजे. समाजाच्या लेकराचा न्यायाचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही करत आहोत. यामागे बाकी ही उदेश नाही. मला अनेक ठिकाणी बालेकिल्ल्याचे प्रश्न विचार आहेत. जिथे मराठा समाज आहे. त्या ठिकाणी आम्ही आज आहोत. कोणाचा बालेकिल्ला आहे म्हणून जायाचे आणि कोणाचा बालेकिल्ला म्हणून जायाचे नाही, असा काही संबंध नाही. सामाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाहिजे.
हेही वाचा – “गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया
सरकारला जनतेचे काही देणे घेणे नसावे
धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशारापर्यंत सभा घेतल्यामुळे आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “गुन्हे दाखल करण्याचे सरकारने चांगले काम सुरू केले आहे. कारण क्रिकेट रात्र दिवस चालते. गोरगरीबांच्या लेकरांचा प्रश्न मार्गी लागू नये. हे सरकारला चालत नसेल. शेवटी सरकारला जनतेचे काही देणे घेणे नसावे. सरकारला जनता महत्वाची नाही. शेवटी क्रिकेट हे संपूर्ण रात्र सुरू राहते. तिथे आरडाओरडा सुरू असतो तिथे काय सर्वांनी काय तोंड बांधल्याले असते का? उलट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा – शरद पवार, फडणवीस….; मी यांची स्क्रिप्ट वाचतो, भुजबळांनी सगळंच सांगितलं
आम्हाला खिंडीत बकडायचे म्हटल्यावर
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “उलट आम्ही सरकारचे काम करत आहोत. हे सरकारने समजून घेतले पाहिजे. आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. मला माहिती आहे की, हे वातावरण दूषित करायचा प्रयत्न करत आहेत. आपण समाजाला शांततेचे आवाहन केले तर तो ऐकतो. सरकारसाठी खूप जमेची बाजू आहे. त्यांच्या बोलण्यावरर समाजात रोष निर्माण झाला आहे. पण आता हा रोष काही अंशी कमी झालेला आहे. पुढे पण बरेसे आहे. मग बघू या आम्हाला खिंडीत बकडायचे म्हटल्यावर बघू या पुढे. आमचा एकही माणूस कारवाईला घाबरणार नाही. आम्ही शांततेत समाजासाठी काम करत आहोत. पोलीस बांधवावर सरकारचा दबाव असू शकतो. कारण त्यांना दोष देऊन उपयोग नाही.”