घरठाणेमला आता अभ्यास करायला वेळ नाही, छगन भुजबळांना मनोज जरांगेंचा टोला

मला आता अभ्यास करायला वेळ नाही, छगन भुजबळांना मनोज जरांगेंचा टोला

Subscribe

जालन्यातील अंबड येथे ओबीसींची महाएल्गार सभा पार पाडली. या सभेच्या माध्यमातून ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला जरांगे यांनी ठाण्याच्या सभेतून प्रत्युत्तर दिले आहे.

ठाणे : मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आता तिव्र झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता या दरम्यानच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरा करून मराठा समाजाची भेट घेणार आहेत. काल पुण्यातील खराडी येथे सभा झाल्यानंतर आज (ता. 21 नोव्हेंबर) जरांगेंची तोफ ठाण्यातील रंगायत नाट्यगृहात धडाडली. जरांगे यांचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले. मराठा समाजाने बाईक रॅली काढत जरांगेंवर फुलांची उधळण केली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जागे राहण्याचे, एकजूट राहण्याचे आवाहन करत सरकारवर आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. (Manoj Jarange Patil’s reply to Chhagan Bhujbal’s criticism)

हेही वाचा – अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्यामुळे तुषार दोशींना बढती – मनोज जरांगे पाटील

- Advertisement -

जालन्यातील अंबड येथे ओबीसींची महाएल्गार सभा पार पाडली. या सभेच्या माध्यमातून ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. जरांगे पाचवी शिकलेले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा, असा सल्ला भुजबळांकडून देण्यात आला. त्यांच्या या सल्ल्याला मनोज जरांगे यांनी आज ठाण्यातील सभेतून प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आरक्षण आता निर्णयाच्या प्रक्रियेत आले आहे. पण एक जण म्हणतो की, मला वाचता येत नाही. ते सांगत आहेत की, आणखी अभ्यास करायला लागेल. पण माझा आरक्षणाचा अभ्यास असो किंवा नसो. मराठ्यांचे लेकरू म्हणून मी लढलो आहे आणि आरक्षण आणले आहे. त्यामुळे आता त्यानेच वाचात बसावे. आत असतानाही (तुरुंगात असताना) ते वाचत होते आणि आता बाहेर आल्यावरही वाच, असे सांगा त्यांना. आम्हाला आता वाचायला किंवा अभ्यास करायला वेळ नाही. मला नाही येत वाचता, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

तसेच, आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही लढत आहोत. पण हे सरकार ठरल्याप्रमाणे करत नाही. एकच माणूस विरोध करत आहे, त्यामुळे त्या एका माणसामुळे 6 कोटी मराठ्यांना कोणी वेठीस धरू शकत नाही.
त्या म्हाताऱ्याची आता काहीच लायकी नाही. वैचारिक विरोध असला पाहिजे तो होतो. पण ज्या दिवशी जातीय तेढ निर्माण केला तेव्हापासून मराठ्यांचा त्या व्यक्तीलाही विरोध आहे. त्यामुळे ती व्यक्ती जितके कार्यक्रम घेणार, तितके मराठे एकत्र येणार. त्यातले म्हणजेच ओबीसीतले तर अर्धे फुटले म्हणून ते पडले परत एकटे. तर मला यांच्या बद्दल संगळे माहीत आहे, असा हल्लाबोल या सभेतून जरांगे यांनी भुजबळांचे नाव न घेता केला आहे. येत्या 24 नोव्हेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, मराठ्यांसाठी तो सोन्याचा क्षण असणार आहे. म्हणून मी शांत आहे. आता 85 टक्के लढाई आपण जिंकलो आहोत. त्यामुळे शांततेत आंदोलन करणार पण आरक्षण मिळवणारच असा विश्वासही पुन्हा जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -