Homeमहाराष्ट्रManoj Jarange : आम्ही दहशतवादी नाही, पंकजा मुंडेंच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

Manoj Jarange : आम्ही दहशतवादी नाही, पंकजा मुंडेंच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

Subscribe

मनोज जरांगे यांनी परवानगी दिली तर मी अंतरवाली सराटीला येऊन मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता मनोज जरांगे यांनी आम्ही काय दहशतवादी आहोत का? असा प्रतीप्रश्न त्यांनी केला.

बीड : मराठा आरक्षणप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर मनोज जरांगे यांनी गेल्या दीड वर्षांचा लेखाजोखा मांडत संताप व्यक्त केला. यानंतर आज त्यांनी अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही, हे सगळ्यांना कळणे गरजेचे आहे. आमचा सरकारसोबत कोणताही संपर्क झालेला नाही आणि आम्हाला सरकारसोबत संपर्क करण्याची गरज नाही. मात्र आपला शत्रू कोण आहे? गरीब मराठ्यांच्या पोरांचा मारेकरी कोण आहे? हे कळणे गरजेचे आहे. याचवेळी त्यांना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, आम्ही काय दहशतवादी आहोत का? असा प्रतीप्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Manoj Jarange reaction to Pankaja Munde demand to join the Antarwali Sarati)

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणाऱ्या लेकरांचा जीव जाऊ न देणं ही मुख्यंत्र्यांची जबाबदारी आहे. असे असले तरी मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे. मराठा तरुणांचे शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको. उपोषणामुळे माझ्या शरीराचं वाटोळं झालं आहे, पण आता तरुणांचं शरीर खराब होता कामा नये. त्यामुळे आज मी सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे. मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या पूर्ण करा, एवढंच मला म्हणायचं आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी केली.

हेही वाचा – Thackeray Vs Fadnavis : ‘CM’च्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, ठाकरे लवकरच फडणवीसांचे…

सगळा देश अंतरवाली सराटीत येऊन गेला

दरम्यान, मनोज जरांगे यांनी परवानगी दिली तर मी अंतरवाली सराटीला येऊन मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता मनोज जरांगे यांनी आम्ही काय दहशतवादी आहोत का? असा प्रतीप्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले की, आमची कोणाला ना नाही. अंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकते आणि जाऊ शकते. कारण आम्ही खुनशी आणि जातीयवादी नाही, किंवा आम्ही कोणावरही डुख धरत नाही. सगळा देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना अंतरवाली सराटीत येण्याची परवानगी दिली. तसेच ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या लोकांचे कल्याण व्हावं हेच आमचे म्हणणे आहे. आमच्या लेकरांना न्याय मिळावा एवढाच आमचा उद्देश आहे. मग अशोक चव्हाण किंवा कोणीही मध्यस्थी केली तरी आमची ना नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

हेही वाचा – Walmik Karad : कराडवर उपचार करणाऱ्या डॉ. थोरातांबद्दल दमानियांचे सवाल; सुरेश धसांनी केली पाठराखण