घरमहाराष्ट्रManoj Jarange : 'ती' कारवाई बंद करा, मुलांना फसवू नका; थेट पोलीस...

Manoj Jarange : ‘ती’ कारवाई बंद करा, मुलांना फसवू नका; थेट पोलीस अधिक्षकांनाच जरांगेंची विनंती

Subscribe

मराठा समजाच्या आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. या दौऱ्यात मराठा समाजाच्या बांधवांशी जरांगे पाटील संवाद साधत आहेत. आज (१५ नोव्हेंबर) मनोज जरांगे पाटील बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मनोज जरांगेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मराठा समजाच्या आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. या दौऱ्यात मराठा समाजाच्या बांधवांशी जरांगे पाटील संवाद साधत आहेत. आज (१५ नोव्हेंबर) मनोज जरांगे पाटील बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मनोज जरांगेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी थेट पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे. तसेच उद्यापासून निष्पाप लोकांना अडकवण्याची कारवाई बंद करण्यात यावी असेही जरांगे म्हणाले आहेत. (manoj jarange request to beed superintendent of police for stop false action)

बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी अनेकांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आणि निष्पाप मुलांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. या पार्श्नभूमीवर आज जरांगे पाटलांना पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.

- Advertisement -

“बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीत सहभागी नसलेल्यांना अटक केली जात आहे. सरसकट त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 307 नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. काही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील पुन्हा त्यांना पोलीस कोठडीत टाकले जात आहे. त्यामुळे ज्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र, ज्यांचा सहभाग नाही अशा तरुणांना विनाकारण त्रास का दिला जात आहे. तर, ज्यांच्या या घटनेशी काहीही संबध नाही अशा गोरगरीब मुलांवर अन्याय होऊ नयेत अशी आम्ही पोलिसांकडे विनंती केली आहे.”, असे जरांगे पाटील पोलीस अधिक्षकांच्या भेटीनंतर म्हणाले..

“जाळपोळ प्रकरणात ज्यांचा संबध नाही अशा लोकांना पोलीस आतमध्ये कसे ठेवू शकतात, किंवा त्यांचे नावं अज्ञातमध्ये घेऊन त्यांची चौकशी कशी करू शकतात. काही अधिकारी विनाकारण मुलांना त्रास देत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांची वेदना आहे, म्हणजेच त्यांनी काही पाप केले नाही. संबध नसतांना त्यांच्यावर तुम्ही अन्याय कसे करू शकतात. परंतु, असा अन्याय होणार नाही”, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे जरांगे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, “ओबीसी नेत्यांच्या दबावाशिवाय असे खोटे गुन्हे दाखल केले जाणारच नाहीत. पण आपल्यावर दबाव असल्याचे आता पोलीस काही सांगणार नाही. पण यात आमचे लेकरं विनाकारण अडकत आहे. आंदोलनात फक्त उभा राहिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वांवर 307 नुसार सरसकट कसे गुन्हे दाखल करण्यात येत आहे”, असेही जरांगे पाटील म्हणाले.


हेही वाचा – मराठा आरक्षण आणि शरद पवार-अजित पवार भेटसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -