Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाManoj Jarange : आता सामूहिक उपोषणाची तयारी ठेवा; मतदानानंतर मनोज जरांगे म्हणाले...

Manoj Jarange : आता सामूहिक उपोषणाची तयारी ठेवा; मतदानानंतर मनोज जरांगे म्हणाले…

Subscribe

जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना, त्यांनी उपोषणाबद्दल आणि कोणाची सत्ता येणार याबद्दल भाष्य केले आहे. “राज्याच्या वतीने आपण सामूहिक उप्षण लावले असून सर्वांनी त्याची तयारी करावी. सरकार स्थापन झाले की, आपण उपोषणाची तारखेची घोषणा करणार आहोत.” असे आवाहन त्यांनी केले आहे. (Manoj Jarange statement on mass hunger strike maratha reservation issues after election voting)

हेही वाचा : Maharshtra Election 2024 : मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढला, फायदा की फटका? 

- Advertisement -

“राज्याच्या वतीने आपण सामूहिक उप्षण लावले असून सर्वांनी त्याची तयारी करावी. सरकार स्थापन झाले की, आपण उपोषणाची तारखेची घोषणा करेन. गावात कुठेही आमरण उपोषण करण्याची गरज आहे. आमरण उपोषण अंतरवली सराटीमध्ये करायचे आहे. आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे असून आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना मतदान केले, त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे आहे,” असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच, ‘मराठांच्या मतावर निवडून आलेल्यांनी जर पक्षाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या बाजूने बोलले तर तर मराठे पुन्हा राज्यात फिरू देणार नाहीत,’ असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना राज्यात कोणाची सत्ता येणार? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर आम्ही मैदानात असतो तर मी नक्कीच अंदाज सांगू शकलो असतो. राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. आता निवडणूक विषय संपलेला असून मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून टाकला आहे. आता पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -