घरमहाराष्ट्रपुणे"ज्यांना मोठे केले तेच आज...", पुण्यातील सभेतून मनोज जरांगेंनी नेत्यांवर साधला निशाणा

“ज्यांना मोठे केले तेच आज…”, पुण्यातील सभेतून मनोज जरांगेंनी नेत्यांवर साधला निशाणा

Subscribe

ज्या नेत्यांना मराठ्यांनी आपले म्हणून मोठे केले ते देखील आज मराठ्याच्या लेकराची मदत करायला तयार नाहीत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राजकीय नेत्यांवर करण्यात आला आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरातील मराठा समाज हा एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहे. राज्यभरातील त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. आज (ता. 20 नोव्हेंबर) पुण्यातील खराडी येथे जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा समाज या सभेला उपस्थित होता. यावेळी सभेतून जरांगे यांनी राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. ज्या नेत्यांना मराठ्यांनी आपले म्हणून मोठे केले ते देखील आज मराठ्याच्या लेकराची मदत करायला तयार नाहीत, असा आरोपच यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Manoj Jarange targeted the leaders from the meeting in Pune)

हेही वाचा – Manoj Jarange : टाइम बॉण्डवरून मनोज जरांगेंना मिळतेय ‘तारिख पे तारिख’

- Advertisement -

पुण्यातील सभेतून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खराडी आणि पुणे शहरातील माझ्या तमाम मराठा बांधवाना माझा जय शिवराय… मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. आम्ही सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिलो. पण आता आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आम्ही कधी जातीवाद केला नाही. सगळ्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवण्याचा काम मराठ्यांनी केले. माझ्या बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. प्रत्येकाला आम्ही आधार दिला. माझ्या बापजद्यांनी अनेकांना दिले. स्वत:चे लेकरू उघड पडले पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळे दिले. जात ही कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे काम केले. लोकांना माझ्या बापाने पोटभरं दिले. पण स्वतःच्या लेकराला उपाशी ठेवले. दुसऱ्यांच्या लेकराच्या सुखात स्वतःच्या पोराचे सुख मानले.

आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का असा सवाल कधीच केला नाही. स्वतःच्या हक्काचे आरक्षण दुसऱ्याला दिले. पण घेऊ नका, असे म्हटलं नाही. आरक्षण सगळ्यांना देऊ दिले. सगळ्यांसाठी माझा बांधव उभा राहिला. आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितले नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिले नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबलो. कधीच कुणाला कमी लेखले नाही. जातीवाद न करण्याचे संस्कार आमच्यावर होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत, असे पुन्हा जरांगे यांच्याकडून पुन्हा बोलून दाखवण्यात आले.

- Advertisement -

तसेच, 75 वर्षात या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजाने केले. आमच्या बांधवांनी कधी जात बघितली नाही. या नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले. मदत लागली तर हे धावून येईल म्हणून यांना मोठे केले. पण ज्यांना मोठे केले ते देखील आज लेकराची मदत करायला तयार नाहीत, मराठा समाजाने ज्या नेत्यांवर विश्वास ठेवला त्यांनीच आपला घात केला आहे. समाज यांच्यासाठी राबला आणि यांना मोठे केले. एकही नेता तुमच्याकडे बघायला तयार नाही आता तरी जागे व्हा. आपल्या लेकरांचा आक्रोश ऐकायाला आता कोणी राहिले नाही. कोणाची मदत आपल्याला होणार नाही. ज्यांना आपण मोठे केले ते आपल्यासमोर उभे आहेत आणि म्हणत आहेत की आरक्षण मिळू देणार नाही त्यामुळे मराठ्यांनो आता सावध व्हा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून या सभेतून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -