घरमहाराष्ट्रManoj Jarange : "काहीही बोलले तर खपवून घेणार नाही", अजित पवारांचा मनोज...

Manoj Jarange : “काहीही बोलले तर खपवून घेणार नाही”, अजित पवारांचा मनोज जरांगेंना इशारा

Subscribe

मराठा आरक्षणा हे टिकण्यासाठी सरकार काम करत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुंबई : आपण काही बोलले तर ते खपवून घेतले जाईल, असे कोणी समजून नये, अशा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. “मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न”, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. यावर आज अजित पवारांनी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटीला यांच्या मागे नक्की कोण आहे. ऐवढे धाडक केस काय होते? असा सवालही अजित पवार यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अजित पवार म्हणाले, “मागासवर्ग आयोगा नेमणे आणि समित्या नेमणे यातून मार्ग काढत असताना. आज जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तव्य केली जातात. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषेचा वापरली जाते. यापूर्वी राज्यात अशी पद्धत कधीच नव्हती. आपण काही बोलले तर ते खपवून घेतले जाईल, असे कोणी समजून नये पण असे होणार नाही. शेवटी सर्वांना नियम कायदे हे सारखे आहेत यांची सर्वांनी नोंद घ्यावी, कारण नसताना समाजाता गैरसमज निर्माण करण्याचे देखील काम करू नये. मराठा आरक्षणा हे टिकण्यासाठी सरकार काम करत आहे. राज्याचे आरक्षण 72 टक्के आरक्षण झालेले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : मनोज जरांगेंनंतर देवेंद्र फडणवीसही मुंबईच्या दिशेने रवाना

ऐवढे धाडक केस काय होते?

अजित पवार म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली. यानंतर सर्व यंत्रणा मराठा आरक्षणासाठी कामाला लागल्या. मराठा आरक्षणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कोणीही असली तरी, प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने मते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, आपण काय आणि कशा पद्धतीने बोलतोय काही विभागीय आयुक्त, कलेक्टर, एसपी अन्य अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांशी बोलताना कशी शिवराळ भाषा वापरली गेली. हे नक्की कोण करतय, ऐवढे धाडक केस काय होते? या खोलात जाण्याची नितांत जाण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन वेळा जालना आणि नवी मुंबईमध्ये गेले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -