घरताज्या घडामोडीMira Road Murder Case : सरस्वती वैद्य हत्याकांडाबाबत नराधम सानेचा खुलासा

Mira Road Murder Case : सरस्वती वैद्य हत्याकांडाबाबत नराधम सानेचा खुलासा

Subscribe

दिल्लीनंतर मुंबईमध्ये देखील महिलांसंदर्भात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. श्रद्धा हत्याकांडाची (Shraddha Walkar Case) मुंबईत पुनरावृत्ती झाली आहे. मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये(Live In RelationShip Case) राहणाऱ्या पार्टनरची निर्घृण हत्या करून आणि तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना घडली आहे. आरोपीचं नाव मनोज साने (Manoj Sane) (५६) असून आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे करून फेकल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याने या कृत्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

काय म्हणाला नराधम साने?

साने आणि मृत सरस्वती वैद्य (Saraswati vaidya) यांची १६ वर्षांपूर्वी भेट झाली होती. तेव्हा साने रेशन दुकानावर काम करत होता. ते दोघेही एकाच समाजाचे असल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती आणि कालांतराने ते रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. पण सानेला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामध्ये दोघांची सतत भांडणं होत होती. त्यामुळे या भांडणाला कंटाळून ४ जून रोजी सरस्वतीनं विष घेतलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तोंडातून फेस येऊ लागल्यामुळे आरोपी साने घाबरला.

- Advertisement -

सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्याला दोषी धरलं जाईल, अशी भीती सानेला वाटायला लागली. त्यामुळे त्याने हे सगळं लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी संपूर्ण खळबळजनक माहिती आरोपी साने याने पोलिसांनी दिली.

- Advertisement -

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे कुणीही तिची चौकशी करणार नाही, असा सानेचा होरा होता. मात्र, तो पूर्णपणे चुकला. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे शंभर तुकडे केले असल्याचा दावा शेजारी राहणाऱ्यांनी केला आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वती कधीही आजूबाजूच्या लोकांशी संबंध ठेवत नसत. त्यांच्या दरवाजावर नेमप्लेटही नव्हती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

१६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आली होती. त्याने कुकरमध्ये जवळपास सात ते आठ तुकडे उकळले होते. या चौकशीत पोलिसांना शरीराचे १३ अवयव सापडले आहेत. या आरोपीला मीरा-भाईंदर येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा :Mumbai Crime : मीरा रोडमध्ये ‘श्रद्धा’ हत्याकांड, करवतीने केले मृतदेहाचे तुकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -