घरमहाराष्ट्रपॅंथरच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी; मनोज संसारेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कार्यकर्ते भावूक

पॅंथरच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी; मनोज संसारेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कार्यकर्ते भावूक

Subscribe

 

मुंबईः युथ रिपब्लिकन पक्ष आणि महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर रविवारी दादार, चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतयात्रेला जनसमुदाय लोटला होता. पॅंथर हरपला, अशीच भावना त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांमध्ये होती. आंबेडकरी अनुयायांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. दलितांचं एक तरुण नेतृत्त्व हरपलं, अशी प्रतिक्रिया दलित नेते आणि कार्यकर्त्यांनी दिली.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून संसारे हे आजारी होते. त्यांना उपचारासाठी महाराष्ट्राबाहेरही नेण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं. संध्याकाळी संसारे यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाची बातमी अवघ्या काही मिनिटांतच मुंबईसह राज्यभर पसरली. वडाळा येथील कोरबा मिठागर येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच या परिसरात शोककळा पसरली. आमचा नेता गेला…, अशीच भावना येथील प्रत्येकामध्ये होती.

- Advertisement -

प्रश्न कोणताही असो आणि कोणाचाही असो, प्रत्येकासाठी संसारे धावून जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते सच्चे अनुयायी होते. शहीद भाई संगारे यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबतही त्यांनी काम केले. पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केला. आक्रमक नेता, अशी त्यांची ओळख होती. आपला पक्ष राज्यभर पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले.

डॉ. आंबेडकर यांची जंयती ते मोठ्या उत्साहात साजरी करायचे. वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या मैदानात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संसारे हे भिम पहाट कार्यक्रमाचे आयोजन करायचे. या कार्यक्रमाला विभागातील नागरिक एकच गर्दी करायचे. संसारे राहत असलेल्या गल्लीत बुद्ध विहार आहे. तसेच त्यांनी भगावान गौतम बुद्धांच्या दोन भव्य मुर्त्याही घेतल्या होत्या. वडाळा, नायगाव येथील अनुयायी या मुर्त्या कार्यक्रमांसाठी घेऊन जायाचे. त्यांनी कधीही मुर्ती देताना कोणतेही शुल्क कोणाकडून घेतले नाही.

ते दोनवेळा अपक्ष नगरसेवक म्हणून वडाळ्यातून निवडून आले. एकदा त्यांची आई नगरसेवक म्हणून निवडून आली. संसारे यांनी विधानसभा निवडणूकही लढवली. मात्र त्यांना यश आले नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -