घरमहाराष्ट्रमनसैनिक अशा हल्ल्यांना घाबरत नाही, पण...; नितीन सरदेसाईंनी व्यक्त केली भीती

मनसैनिक अशा हल्ल्यांना घाबरत नाही, पण…; नितीन सरदेसाईंनी व्यक्त केली भीती

Subscribe

Nitin Sardesai Reaction | मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Nitin Sardesai Reaction | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. चार अज्ञात हल्लेखोरांनी संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्पने हल्ला केला. याप्रकरणी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोरांचा शोध नाही लागला तर मनसैनिक आक्रम होतील. त्यानंतर काय होईल हे सांगता येणार नाही, अशी भिती त्यांनी आज व्यक्त केली.

हेही वाचा – मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

- Advertisement -

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यावेळी हिंदुजा रुग्णालयात मनसेचे अनेक नेते आणि पदाधिकारी हजर होते. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नितीन सरदेसाई म्हणाले की, “या हल्ल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्यामागील गुन्हेगार तात्काळ सापडला पाहिजे. तपास यंत्रणांनी चोख काम करावं. हल्लेखोरांवर तत्काळ कडक शासन झालं पाहिजे. तसंच, त्यांच्यामागे कोण आहेत याचाही शोध घेतला पाहिजे. सध्या मनसैनिक अत्यंत संतप्त झाले आहेत. हल्लेखोर वेळेत सापडले नाहीत तर मनसैनिक आक्रमक होतील. मला माहीत नाही, पण काहीही होऊ शकतं. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असं काहीतरी होईल असं कोणलाही वाटलं नव्हतं. मनसैनिक अशा गोष्टींना घाबरत नसतो. त्याचं लवकरच उत्तर मिळेल.”

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊत म्हणतात, संदीप देशपांडे कोण? राहतात कुठे?

संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरतेय. तसंच, शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या असा हल्ला झाल्याने दादरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून हा राजकीय हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची अधिकची माहिती मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -