कोणीही माईका लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही, मनसैनिकांचा बृजभूषण सिंह यांना फोन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच त्यांनी ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांच्याविरोधात अयोध्येत पोस्टरबाजी केली जात आहे. राज ठाकरे परत जा, या मथळ्याखाली पोस्टरबाजी अयोध्येत केली जात आहे. तसंच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध कायम ठेवला आहे. अशातच मनसैनिकांनी भाजप खासदार बृजभूषण सिहं यांना फोन करून त्यांना इशारा दिला आहे.

मनसैनिकांचा बृजभूषण सिंह यांना फोन

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध न करण्याचं आवाहन मनसैनिक तुलसी जोशी यांनी केलं आहे. या संबंधित एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्री राम, जय श्री राम, जय महाराष्ट्र मी तुलसी जोशी बोलत आहे. मी राज ठाकरेंचा एक छोटा महाराष्ट्र सैनिक असून मी महाराष्ट्रातून बोलत आहे. तुम्ही काल ज्याप्रकारे राज ठाकरेंनी माफी मागवी, अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्याबाबत तुलसी जोशी म्हणाले की, हे विधान तुमच्या पर्सनॅलिटीला आणि स्वभावाला शोभून दिसत नाही. असून करून तुमचं नाव गीनीज बुक किंवा लिमका बुकमध्ये येणार नाहीये, असं तुलसी जोशी म्हणाले.

आम्ही योगींकडून सल्ला घेत नाही…

त्यानंतर बृजभूषण सिंह म्हणाले की, मला तुमच्यासोबत वाद घालायचे नाहीयेत. तेव्हा जोशी म्हणाले की, तुमचं बरोबर आहे. कारण तुम्ही एक सूज्ञान व्यक्ती आहात. या विधानाला काहीही महत्व नाहीये. कारण तुम्ही योगींकडून सल्ला घेता आणि अशा प्रकारची विधानं करता. मात्र, यावेळी सिंह म्हणाले की, आम्ही योगींकडून सल्ला घेत नाही, तर योगीजी माझ्याकडून सल्ला घेतात, असं सिंह म्हणाले.

कोणीही माईका लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही

मनसेचा पाच तारखेला अयोध्या दौरा असून त्यांच नियोजन करण्यात आलंय. परंतु मी तुम्हाला अयोध्येत पाय ठेऊन देणार नाही, असं विधान खासदार बृजभूषण सिंह यांनी केलं आहे. त्यांनी मला फोन करुन समज दिली आहे. त्यांच्या विचार देखील वेगळा आहे. कोणीही माईका लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही, असं तुलसी जोशी म्हणाले.

बृजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर शेअर करत राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंच्या विरोधासाठी चलो अयोध्या महाअभियान घोषित केलं आहे. तसंच, बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात माफी मागा अन्यथा माघारी जा या अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे.


हेही वाचा : अयोध्येत राज ठाकरेंविरोधात पोस्टर्सबाजी, न येण्याची मागणी