Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Mansukh Hirean Death Case : हिरेन हत्येप्रकरणी अटकेतले सुनील माने पोलीस दलातून...

Mansukh Hirean Death Case : हिरेन हत्येप्रकरणी अटकेतले सुनील माने पोलीस दलातून निलंबित

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सुनील माने यांना निलंबित करण्यात आलं आहे. काल मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात क्राईम ब्रांचचे माजी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंची मदत करण्याचा सहभाग आढळल्याने अटक करण्यात आली होती. काल एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनील माने यांना २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती काल एनआयएने न्यायालयात दिली होती. दरम्यान, NIA च्या विशेष न्यायालयाने NIA कोठडी सूनवल्यानंतर अखेर सुनील माने यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय NIA ला आहे. ३ मार्च रोजी सचिन वाझे यांच्या CIU च्या केबिनमध्ये सुनील माने, विनायक शिंदे आणि सचिन माने यांची बैठक झाली होती. या बैठकीत मनसुखच्या हत्येची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती. या भेटीचे पुरावे NIA ला मिळाले आहेत. कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला ४ मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी असा संशय देखील NIA ला आहे.

 

- Advertisement -