घरताज्या घडामोडीअखेर NIAने हिरेन हत्येत वाझेचे कनेक्शन शोधलेच, महत्त्वाचे CCTV फुटेज हाती

अखेर NIAने हिरेन हत्येत वाझेचे कनेक्शन शोधलेच, महत्त्वाचे CCTV फुटेज हाती

Subscribe

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएची (NIA) टीम सचिन वाझेची कसून चौकशी करत आहे. याच प्रकरणी काल (सोमवारी) रात्री उशिरा एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर नाट्यरुपांतर करण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान एनआयएच्या टीमला मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (mansukh hiren murder case) मोठे यश आले असून याबाबतचा मोठा खुलासा झाला आहे. ४ मार्चला सीएसएमटी स्टेशनकडे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले असून मनसुख हिरेन हत्येतील सचिन वाझेचे कनेक्शन शोधले गेले आहे. तसेच हिरेन यांच्या हत्येनंतर वाझेने केलेला खोटा ड्रामा देखील उघडकीस आला आहे.

सचिन वाझे ४ मार्चला सायंकाळी लोकलने कळवा येथे पोहोचला होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर पुन्हा वाझे कळवा येथून सँडहर्स्ट रोड येथे आला. त्यानंतर तो डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन टिपसी बारवर रेडसाठी जात असल्याची नोंदणी त्याने डायरीमध्ये केली होती. पण आता NIAच्या हाती सीएसटीएमपासून ते कळवापर्यंतचे रेल्वे स्टेशनवरील फुटेज लागले आहे. याच सीनचे पुन्हा नाट्यरुपांतर सोमवारी रात्री कळवा आणि सीएसएमटी येथे करण्यात आले. सचिन वाझेला कळवा आणि सीएसएमटी येथे काही पाऊल चालायला लावली. यादरम्यान वाझेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

यापूर्वी सचिन वाझेला घेऊन अशाच प्रकारे मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर तसेच मिठी नदीवरील संबंधित स्पॉटवर नाट्यरुपांतर करण्यात आले होते. याप्रकरणात वाझेच्या अनेक महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामधील एक बाईक वाझेची मिस्ट्री वुमन मीना जॉर्ज हिच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.

CSMT स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट | NIA reacreated crime scene at CSMT station

मनसुख हिरेन हत्येमध्ये एपीआय सचिन वाझे यांचा सहभाग होता याबाबतचा मोठा उलगडा करण्यात NIA च्या टीमला यश आले आहे. गेल्या महिन्यात ४ मार्च रोजी सीएसएमटी येथे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज NIA च्या टीमच्या हाती लागले आहे. मनसुख हिरेनच्या हत्येच्यावेळी सचिन वाझे कळव्यासाठी लोकल ट्रेनने पोहचला होता. त्यानंतर कळव्याहून मनसुख हिरेन याच्या हत्येनंतर पुन्हा कळवा येथून ट्रेन ने सेंडहर्स्ट रोड येथे आला. तेथून डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन टिपसी बार रेड साठी जात असल्याची डायरी एन्ट्री केली होती. NIA ने CSTM पासून कळवा पर्यत चे रेल्वे स्थानकावरील फुटेज मिळवले. त्यानंतर सोमवारी रात्री कळवा ,सीएसटी येथे सचिन वाझे ला घेऊन सिन रिक्रेएट करण्यात आला. सचिन वाझेला कळवा सीएसटी येथे फलाटावर काही पाऊले चालायला लावले.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, April 6, 2021 

- Advertisement -

हेही वाचा – Sachin Vaze Case: सचिन वाझेच्या मिस्ट्री वुमनची साडे सात लाखांची बाईक NIAच्या हाती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -