घरमहाराष्ट्रमंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे मंगळवारी वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे मंगळवारी वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Subscribe

मुंबईः पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने वतीने गौरविण्यात येते. उद्या, ९ मे २०२३  रोजी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार साेहळा सह्याद्री अतिथीगृह, सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर आणि अजय वैद्य यांना कृ. पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा वर्ष २०२१ आणि २०२२ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा उद्या, ९ मे रोजी दुपारी ३:३० वाजता सह्याद्री अतिथीगृह, सभागृह येथे होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे या पुरस्कार साेहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

सन २०२१चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तप्रतिनिधी) दै. बीड रिपोर्टरचे पत्रकार शेख रिजवान शेख खलील तर इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी न्यूज १८ लोकमतचे पत्रकार विलास बडे यांना तर संघाचे सदस्य दै. भास्करचे पत्रकार विनोद यादव यांना जाहीर झाला आहे. २०२२ साठी हा पुरस्कार पुण्य नगरीचे गडचिरोली प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांना, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी साम टीव्हीच्या ब्युरो चिफ रश्मी पुराणीक यांना तर संघाचे सदस्य पुण्यनगरीचे पत्रकार किशोर आपटे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सोहळ्याचे नियोजन अध्यक्ष प्रमोद डाेईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव व कार्यकारिणी सदस्य अलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्याकडून करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -