राष्ट्रवादी, शिवसेनेला विधान परिषदेसाठी अनेक अपक्ष आमदारांचा पाठिंबा, जयंत पाटलांचा दावा

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे मतदान लोकशाहीनुसार व्हायला हवे, कारण त्यांच्याविरोधातील गुन्हा सिद्ध झालेला नाही,'' अस मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

Many independent MLAs support NCP, Shiv Sena for Legislative Council election 2022 claims Jayant Patil

विधान परिषद निवडणुकीत आता महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपने या निवडणुकीत सदाभाऊ खोत सहावा उमेदवार घोषित केला. त्यामुळे भाजपसह आता सर्वच पक्षांनी अपक्ष आमदारांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडूनही अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशात आज राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी, शिवसेनाला विधान परिषदेसाठी अनेक अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचे अनावरण केले. याचवेळी जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, “भाजपला ज्या अपक्ष आमदारांनी पाठींबा दिली आहे त्यांनासोबत नेण्यात आमचा काही आक्षेप नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाला विधान सभेसाठी अनेक अपक्ष आमदारांचा पाठींबा आहे. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे,” असा दावा त्यांनी केला.

“भाजपने ताकदीप्रमाणे जेवढे उमेदवार निवडून येतील तेवढीच संख्या राहिल अशी अपेक्षा आहे. मतांचा घोडेबाजार होणार नाही यासाठी भाजप साधन सुचीत सांभळणार पक्ष आहे. तो त्या मर्यादेत आपले उमेदवार उभा करेल अशी अपेक्षा आहे.” असे देखील जयंत पाटील म्हणाले.

“भाजपकडून नेहमी भ्रमनिरास”

”भाजपकडून चांगली अपेक्षा आम्ही ठेवत आलो. मात्र प्रत्येक वेळी आमचा भ्रमनिरास केला जातो. परंतु अपेक्षा या ठेवल्या जातातच. पण आता नेहमी अपेक्षा भंग करणाऱ्यांकडून अपेक्षा केल्या नाही पाहिजेत तरीही आम्ही विधानपरिषदेत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो,” असा देखील जयंत पाटील म्हणाले.

… तर इतिहाज जलील यांच्या मतांचे स्वागत

“इतियाज जलील आज भेटणार असून सध्या ते प्रवासात आहेत. त्यांचे दोन उमेदवार आहेत त्यामुळे प्रत्येक मताला एक किंमत आहे, त्यामुळे त्यांनी समर्थन करु इच्छित किंवा भाजपविरोधात मत देऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे मतदान लोकशाहीनुसार व्हायला हवे, कारण त्यांच्याविरोधातील गुन्हा सिद्ध झालेला नाही,” अस मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

“10 जूनला राज्यसभा निवडणुका असल्याने 20 तारखेला सभा होणार होती, मात्र 20 जूनलाही विधानपरिषदेची निवडणूक असल्याने पुढच्या महिन्यात देशातील विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस युवक राष्ट्रवादी नवीन वेळ ठरवण्यात येईल.” अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली आहे.