घरताज्या घडामोडीशिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Subscribe

'खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत शिवसेनेला बुडवणार.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यानंतर राणेंवर (Narayan Rane Arrest) कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेना (Shiv sena) विरुद्ध राणे अशा वादाला सुरुवात होऊन आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ‘खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेला बुडवणार. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार आज माझ्या संपर्कात’, असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केले आहे. (Many MLA from Shiv Sena in my contact-Narayan Rane)  ‘भविष्यात महाराष्ट्रात आमचेच सरकार असेल. माझ्या पाठीमागे लागू नका, मी आता थोडे बोलतोय पण बोलायला लागलो तर तुम्हाला परवडणार नाही’, असा इशारा देखील नारायण राणेंनी दिला आहे.

दरम्यान राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर केलेली कारवाई ही कायदेशीर नसून ती जबरदस्तीने करण्यात आल्याचे म्हटले. सत्तेची मस्ती दाखवण्याचा काहींसा प्रयत्न आहे. कारवाई करा पण कायदेशीर. कायद्याबाहेर जाऊन कराल तर सामोरे जावे लागेल, अशी टीका नारायण राणेंनी केली.

- Advertisement -

देशात कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू हे महाराष्ट्रात झाले. ही यांची ख्याती आहे. बंधनं फक्त राणेंसाठी आम्ही या देशात राहतो आम्हाला मनाई का? सत्तेची मस्ती आहे, दुसर काही नाही, अशी टीका राणेंनी केली. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. राज्यात खुन, दरोडे होतात असे म्हणत सुशांत सिंह राजपूर, दिशा सालियन प्रकरणातील आरोपी अद्याप मिळालेले नाही याचा उल्लेख देखील राणे यांनी केला. मी गुन्हेगार होतो तर मुख्यमंत्री कसा झालो? ३९ वर्ष सोबत होतो. काय घडत सगळं ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यावर बोलू नका, पुढचे आमदार,खासदार आमचे असतील याची आम्ही काळजी घेऊ,असा इशारा राणे यांनी दिला आहे.

जनआशीर्वाद यात्रेविषयी बोलताना राणेंनी सर्व अहवाल पंतप्रधान मोदींना सादर करणार असल्याचे सांगितले. जनआशीर्वाद यात्रेमुळे लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. पंतप्रधान मोदींमुळे मला केंद्रीय मंत्रीपद मिळाले. कोकणाच्या सुपुत्राला केंद्रात मंत्रीपद मिळाले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. यात्रेच्या पुढच्या दौऱ्यासाठी रत्नागिरीत आलो. वादळ,पूराची माहिती घेऊन शासनाकडून मदत मिळाली की नाही याची पाहणी केली. या सगळ्याचा एकत्रित अहवाल पंतप्रधान मोदींना देणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

- Advertisement -

 


हेही वाचा – दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -