रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द, मार्गांत बदल; प्रवासाचं नियोजन करण्याआधी ही बातमी वाचाच!

maharashtra express train

Kolhapur Travel News | कोल्हापूर – कोल्हापुरातून इतर ठिकाणी ट्रेनने प्रवास करण्याच्या बेतात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कोल्हापूर रेल्वे स्थानकातून (Kolhapur Railway Station) सुटणाऱ्या अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. तर, काही रेल्वे रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासाचं नियोजन करताना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

मिरज ते पुणे या रेल्वे मार्गावरील कोरेगाव ते सातार स्थानकांच्या दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी काही रेल्वे रद्द करण्यात आले असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे बदललेले वेळापत्रक आज आणि उद्यासाठी लागू असेल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी गोंदियाहून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस (Maharashtra Express) कोल्हापुरला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहे. तर, २८ फेब्रुवारीला ही एक्स्प्रेस कोल्हापूरऐवजी पुण्यावरून तिच्या निर्धारित वेळेत गोंदियासाठी निघणार आहे. तर, २८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून सुटणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस (Nijamuddin Express) दौंड ते कुर्डूवाडी ते मिरज या मार्गाने धावणार आहे. सांगली-कराड-सातारा-पुणे अशा मार्गांवरून ही रेल्वे जाणार नाही, असंही रेल्वे विभागाकडून कळवण्यात आले आहे.

दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर ते पुणे आणि कोल्हापूर ते सातारा पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. २ मार्चपर्यंत या पॅसेंजर बंद राहणार आहेत. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा गोंधळ उडणार आहे.

कोकणात होळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने होळी सणासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ९० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – होळीनिमित्त कोकणसह ‘या’ भागांसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या