घरताज्या घडामोडीधक्कादायक: माओवाद्यांचा अचानक हल्ला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

धक्कादायक: माओवाद्यांचा अचानक हल्ला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Subscribe

पोलिसांना हल्ल्याची पुर्वकल्पना होती

मागील महिन्यापासून माओवाद्यांनी आणि नक्षलवाद्यांनी गडचिरोली, छत्तीसगडमध्ये हैदोस घातला आहे. आज गुरुवार(२३ एप्रिल) रोजी माओवाद्यांनी पोलिस ठाण्यावर गोळीबार केला या गोळीबारादरम्यान माओवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आलाय, या हल्ल्याला पोलिसांकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर माओवाद्यांनी जंगलात धूम ठोकली आहे. पोलिसांनी सतर्कतेने दिलेल्या प्रतिउत्तरामुळे माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती.

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात जांबिया गट्टा पालिस ठाण्यावर माओवाद्यांनी बुधवारच्या मध्यरात्री अंधाधुंद गोळीबार केला, या गोळाबारामध्ये पोलीस ठाण्यावर ग्रेनेडचा मारा करण्यात आला परंतु सुदैवाने त्या ग्रेनेडचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलीसांनी हल्ल्यापूर्वीच सतर्कता बाळगली होती. माओवाद्यांच्या गोळीबाराला पोलिसांनी प्रतिउत्तर देत माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला, पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळून गेले.

- Advertisement -

पोलिसांना हल्ल्याची पुर्वकल्पना होती

माओवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. काही सशस्त्र माओवादी पोलीस ठाण्याच्या एका बाजूला असल्याचा आंदाज पोलिसांना होता. पोलीस ठाण्यावर गोळीबार केल्यानंतर पोलीस बाहेर निघतील असं काहीसे माओवाद्यांना वाटले होते. परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य आणि पुर्वकल्पना असल्यामुळे सतर्कता बाळगली होती. माओवाद्यांनी हल्ला केल्यानंतर पोलीसांनी प्रतिउत्तरात माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. माओवाद्यांवर गोळीबार सुरु झाल्यामुळे ते जंगलात गेले त्यामुळे मओवाद्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -