घरमहाराष्ट्र...भाषणात काय बोलता याचे तुम्हाला भान आहे का? आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्याविरोधात मराठा...

…भाषणात काय बोलता याचे तुम्हाला भान आहे का? आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Subscribe

मुंबई – मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चाने याबाबत नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावंत सकल मराठा समाजाची माफी मागा.  तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

पुढे त्यांनी मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, असा जाबही मराठा क्रांती मोर्चाने विचारला आहे .

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -