घरताज्या घडामोडीमराठा क्रांती मोर्चाची पुन्हा धडक, शिवनेरी ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार

मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा धडक, शिवनेरी ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार

Subscribe

राज्यातील ठाकरे सरकार सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत आहे. याचा जाब सरकारला विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ‘शिवनेरी ते मुंबई’ असा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे हा ‘लाँग मार्च’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर चालढकल करत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजेच प्रस्थापित मराठ्यांचे सरकार आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, शरद पवार यांचा सिल्वर ओक बंगला आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर हा लाँग मार्च काढण्याचे ठरले आहे. या लाँग मार्चसाठी सर्व नियोजन पूर्ण झाले असून, लवकरच त्याची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही केरे म्हणाले.

- Advertisement -

लाँग मार्चसाठी अनेक संघटनासोबत चर्चा झाली आहे. यावर पुढील 8 दिवसांत राज्यव्यापी बैठक होणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -