घरमहाराष्ट्रमराठा आंदोलन चिघळले; खा. चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की

मराठा आंदोलन चिघळले; खा. चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की

Subscribe

मराठा आरक्षणासाठी पुरकारलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसकवळण आले आहे. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे याच्या अत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना आंदोलकांनी धक्काबुक्की करत हकलावून लावले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई, पुणे, सातारा आणि सोलापूर वगळता राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोमावारी आंदोलनावेळी गोदावरी नदी पात्रामध्ये उडी मारुन जीवन संपवणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्यावर आज कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आले असता आंदोलकांनी गोंधळ घालत खैरेंना धक्काबुक्की केली. दरम्यान खैरे काहीच न बोलता घटना स्थळावरुन निघून गेले.

खासदार चंद्रकांत खैरे यांना काकासाहेब शिंदे यांच्या अंत्ययात्रेत धक्काबुकी…

Posted by My Mahanagar on Monday, 23 July 2018

- Advertisement -

आरक्षणाच्या मागणीसाठी घेतली जलसमाधी

सोमवारी औरंगाबादच्या गोदावरी नदी पुलावरुन आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीपात्रामध्ये जलसमाधी घेतली. त्याला नदी पात्रातून बाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी रास्तारोका, जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक करण्यात येत आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करुन लेखी आश्वासन दिल्यानंतरच आज आंदोलकांनी काकासाहेब याचा मृतदेह स्विकारला.

- Advertisement -

शिंदे कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

काकासाहेब शिंदे या तरुणाच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. आंदोलकांनी काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने शिंदे कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत आणि त्याच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचे मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर शिंदे कुटुंबियांनी आणि आंदोलकांनी त्याचा मृतदेह स्विकारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -