घरमहाराष्ट्रमराठा-ओबीसी म्हणजे इंडिया- पाकिस्तानचे लोक नाहीत; संभाजीराजे छत्रपतींची भूमिका

मराठा-ओबीसी म्हणजे इंडिया- पाकिस्तानचे लोक नाहीत; संभाजीराजे छत्रपतींची भूमिका

Subscribe

मराठा आणि ओबीसी समाजात समन्वय घडून सलोखा रहावा यासाठी सोमवारी (20 नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठा-ओबीसी समाजाची बैठक पार पडली

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून निर्माण झालेली सामाजिक दरी साधून मराठा आणि ओबीसी समाजात समन्वय घडून सलोखा रहावा यासाठी सोमवारी (20 नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठा-ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला संभाजीराजे, ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Maratha OBCs are not the people of India Pakistan Role of Sambhaji Raje Chhatrapati)

मराठा-ओबीसी म्हणजे इंडिया- पाकिस्तानचे लोक नाहीत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, विविध संतानी संस्कार दिले. अशा राज्यात वातावरण पेटले तर ते राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाबाबत लवकर तोडगा काढावा, अशी भूमिका संभाजीराजे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मांडली.

- Advertisement -

छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या स्तरावरील भाषण केले. ते भाषण ओबीसी समाजालाही आवडले नाही. मी भुजबळांना काही वर्षांपूर्वी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणालो होतो. परंतू आता त्याची मला लाज वाटते, अशा शब्दात संभाजीराजेंनी भुजबळांचा समाचार घेतला. मोठा भाऊ मराठा आहे, छोटा भाऊ ओबीसी आहे. आम्ही भाऊबंद आहोत. आज एकत्रत आहोत आणि उद्याही एकत्र राहू, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस थेटच बोलले; संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसून आली

- Advertisement -

बारा बलुतेदारांना आरक्षण मिळाले पाहीजे-राठोड

राज्यात ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढे आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याचे हरिभाऊ राठोड यांनी यावेळी सांगितले. जे बारा बलुतेदार आरक्षणाबाहेर आहेत, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राठोड यांनी यावेळी केले. ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवारही उपस्थित होते. चार महिन्यांनी भुजबळ भाजपच्या व्यासपीठावर जाऊन कमळाला मतदान करा सांगतील तेव्हा विजय वड्डेटीवार काय करतील, असा सवाल राठोड यांनी यावेळी केला. मराठा-ओबीसी एक झाले तर आपली ताकद वाढेल. मग आपल्या कुठल्या मागण्या थांबणार नाहीत. रोहिणी आयोग लागू करण्यासाठी आपण दिल्लीत एकत्र मोर्चे काढू, असेही राठोड यावेळी म्हणाले.

हेही वाचा : मुलीला सिगरेटचे चटके देऊन अघोरी अत्याचार करेपर्यंत पालक अज्ञानी कसे राहिले; चित्रा वाघ यांचा…

भुजबळांनी सत्ता सोडावी- विजय वडेट्टीवार

दरम्यान, सत्तेत राहून देखील समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर छगन भुजबळ यांनी सत्ता सोडावी, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज दिला. समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? असा सवाल करत शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे. मी आणि माझा पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही. सरकारकडून अनेकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन झाले आहे. त्यामुळे सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर भुजबळ यांनी सत्ता सोडली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -