घरताज्या घडामोडीमराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत धनंजय मुडेंसह जयंत पाटील यांच्या गाड्यांचा अडवला ताफा

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत धनंजय मुडेंसह जयंत पाटील यांच्या गाड्यांचा अडवला ताफा

Subscribe

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात परिवास संवाद यात्रा सुरु केली आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या परिणामामुळे ही यात्रा मंगळवारपासून स्थगित करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये या यात्रेला स्थगित करण्यात आले. परिवार संवाद यात्रेसाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा आंदोलकांनी ताफा आडवला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांचा संताप पाहून जयंत पाटील यांनी गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकानी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांचा ताफा आडवला होता. एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलकांनी या नेत्यांच्या गाड्यांना घेराव घातला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवास संवाद रॅलीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर हिंगोलीच्या दिशेने जात होत्या. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आंदोलकांची आक्रमकपणा पाहिल्यामुळे जयंत पाटील यांनी आदोलनकर्त्याशी संवाद साधला आणि त्यांच्या निवेदनही स्विकारले आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांनीही आंदोलकांचे निवेदन स्विकराले आहे.

परिवार संवाद यात्रेला ब्रेक

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ यामुळे राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा हिंगोलीत स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेला तुळजापूर पासुन सुरुवात करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करण्यात येत आहे. हिंगोलीतील परिवार संवाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचेही समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा परिवार संवाद यात्रा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -