घरमहाराष्ट्रआरक्षणासाठी मराठा आंदोलकांचे आत्महत्याचे सत्र सुरूच, नांदेडमधील तरुणाने संपवले जीवन

आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचे आत्महत्याचे सत्र सुरूच, नांदेडमधील तरुणाने संपवले जीवन

Subscribe

मराठा आंदोलकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करण्यात येत असतानाही मराठा आंदोलक आत्महत्या करत आहेत. आता पुन्हा एकदा नांदेड येथील तरुण मराठा आंदोलकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे.

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर सरकारकडून मात्र 2 जानेवारीपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाने आता 24 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवावी, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. पण त्यांच्या या आवाहनाला मराठा आंदोलकांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचेच पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आंदोलकांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. (Maratha protestors’ suicide session for reservation continues, youth in Nanded ends his life)

 हेही वाचा – खोट्या प्रतिज्ञापत्रावरील टीकेला अजित पवार गटाचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले…

- Advertisement -

गेल्या काही महिन्यात बऱ्याचशा मराठा आंदोलकांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये तरुण मराठा आंदोलकांचा समावेश आहे. मराठा आंदोलकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करण्यात येत असतानाही मराठा आंदोलक आत्महत्या करत आहेत. आता पुन्हा एकदा नांदेड येथील तरुण मराठा आंदोलकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नांदेड येथील दाजीबा रामदास कदम या 25 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मरळक येथे राहणारा दाजीबा रामदास कदम हा 25 वर्षीय तरुण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. दाजीबा हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. परंतु, आरक्षण नसल्यामुळे दाजीबा काही करू शकला नाही, तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असे मृत दाजीबाच्या भावाकडून सांगण्यात आले. 11 नोव्हेंबरला विष प्रशान केल्यानंतर दाजीबा कदमला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दाजीबा कदम याच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली होती. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

- Advertisement -

तर, दाजीबा याच्या आत्महत्येनंतर शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असे तहसीलदार विजय आवधान यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, मराठा आरक्षणावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी विठ्ठल पावडे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर आता लवकरच मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -