घरमहाराष्ट्रVIDEO: मराठा समाज आक्रमक; टायर पेटवून पंढरपूर-पुणे मार्ग आंदोलकांनी रोखला

VIDEO: मराठा समाज आक्रमक; टायर पेटवून पंढरपूर-पुणे मार्ग आंदोलकांनी रोखला

Subscribe

मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठल्याचे बघायला मिळाले. अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले. राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे.

- Advertisement -

टायर जाळून वाहतूक बंद

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याची माहिती मिळतेय.

आज सोलापूर जिल्हा बंदची हाक

सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला असून माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला असल्याचे सांगितले जात आहे.


‘भल्या पहाटेचे फडणवीसांचे सरकार वाचवण्यासाठी काही अधिकारी राबत होते’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -