पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना अनेकदा भेट दिली, मराठा आरक्षण राज्याचा विषय – चंद्रकांत पाटील

संभाजीराजेंच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा

Maratha reservation Chandrakant Patil says Prime Minister Modi meet Sambhaji Raje many times
पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना अनेकदा भेट दिली, मराठा आरक्षण राज्याचा विषय - चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा विषय केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या आखत्यारित असल्याचे सांगितले आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितीली होती. मोदींना राजेंची ४ वेळा पत्रव्यवहार करुनही भेट दिली नसल्यामुळे राजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी ४ वेळा भेट मागितली त्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजेंना ४० वेळा भेट दिली आहे. परंतु राजे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट मागत आहेत. मोदींना वाटत आहे की, मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. तसेच कोरोनाचे संकट असल्यामुळेही मोदींनी भेट दिली नसल्याचे कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपतींनी महाराष्ट्र दौरा केला आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करण्याची भूमिका राजेंनी घेतली होती परंतु ४ वेळा पत्रव्यवहार करुनही मोदींनी भेट दिली नसल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाचा विषय हा राज्याचा आहे. राज्य सरकार याला समर्थ असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नाही असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना नेहमीच सन्मान दिला आहे. संभाजीराजे भाजपमध्ये आल्यापासून पंतप्रधान मोदींनी त्यांना अनेकदा भेट दिली आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आणि मराठा आरक्षण हा राज्याच्या आखत्यारित विषय असल्यामुळे संभाजीराजेंना भेट दिली नसावी. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोदींना ४ वेळा पत्रव्यवहार केला परंतु याचा विषय मराठा आरक्षणावरील चर्चा असाच होता. मराठा आरक्षण राज्याचा विषय आहे. यामध्ये केंद्राची भूमिका नसल्यामुळेच मोदींनी भेट नाकारली असावी परंतु राजेंनी भेट मागण्यापुर्वी मोदी राजेंनी भेट मागितल्या मागितल्या लगेच भेट देत होते दरम्यान ४० वेळा भेटी झाल्या असतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपमने राजेंना नेहमीच सन्मान दिला

संभाजीराजे छत्रपती भाजपमध्ये प्रवेश करणार तेव्हा त्यांना पार्टीत सहभागी झाल्यावर एबी फॉर्म अशा तीन ते चार प्रक्रियेतून जावे लागणार होते. याबाबत मोदींनी फोन केला होता, मोदी म्हणाले की, ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार करु यानंतर प्रयागमध्ये एक कार्यक्रमाला संभाजीराजेंना घेऊन जाण्यात आले तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्या केंद्रीय मंत्री मंडळ आणि सर्व राज्यांच्या अध्यक्षांना संबोधले की छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचे सगळ्यांनी उभे राहून अभिनंदन करावं असे म्हणताच सगळ्या नेत्यांनी, मंत्र्यांनी तसेच मोदींनीही उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले असल्याचा किस्सा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितला आहे.

संभाजीराजेंच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणामध्ये खासदारकीचाही राजीनामा देईल असे म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे भाजप आणि खासदार संभाजीराजे यांच्या मतभेद असल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करता त्यांचे त्यांना स्वातंत्र्य आहे. आमच्याकडून राजेंबाबत काही अपशब्द निघणार नाही. मराठा समाजाचे नेतृत्व राजे करत असतील तर त्यांच्या आंदोलनात भाजप पक्ष आणि झेडा बाजूला ठेवून नेहमी सहभागी होईल. तसेच जर अन्य कोणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असेल तर भाजप त्यांच्याही पाठीशी उभा राहील परंतु भाजप स्वतः आंदोलने करणार नाही असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.