घरमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची - मनोज...

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची – मनोज जरांगे

Subscribe

छगन भुजबळ हे राजकारणी आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा बांधवात तेढ निर्माण करू लागले आहे. राज्य सरकार भुजबळांना घाबरत नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

रायगड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रायगड दौऱ्यावर आहेत. ज्या दिवशी मराठ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईल, त्यावेळी खरी दिवाळी आणि गुलाल उधळणे काय असते. हे संपूर्ण देशाला कळेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगाची आहे’, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील राज्य सरकारच्या सर्वेक्षणावर दिली आहे.

आरक्षण मिळाल्यानंतर गुलाल उधळत रायगडावर येणार, असे तुम्ही म्हटला होतात. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो. हे मी यापूर्वीच म्हटले होते. आता मराठ्यासाठी कायदा झाला आहे. यानुसार ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत. त्यासाठी ‘सगेसोयरे’ म्हणून कायदा तयार केला आहे. आता मराठा ओबीसीमध्ये जाण्यापासून वंचित राहणार नाही. या कायद्याच्या माध्यमातून एका सगेसोयऱ्याला प्रमाणपत्र मिळाले की, मग बघा महादिवाळी आणि गुलाल.

- Advertisement -

मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची

राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी निरक्षर आणि विद्यार्थी सर्वेक्षण करत आहे. या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगाची आहे.” मनोज जरांगे पाटील म्हणाले, “रायगडावर आल्यानंतर एक ऊर्जा मिळते. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या नाही. ज्या मराठ्यांचा कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरे म्हणून अध्यादेश काढला आहे. यामुळे एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही. रायगडावर पायी जाणार आहे”, अशीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Rajya Sabha Elections : भाजपाची रणनीती ठरली; ‘मविआ’साठी तारेवरची कसरत

- Advertisement -

धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देऊ

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर, धनगर, मुस्लिम यांच्या आरक्षणासाठी लढा देणार आहात का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “धनगर आणि मुस्लिम बांधवाना आरक्षण कसे देत नाही हेच बघतोय, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

देश पातळीवर नेतृत्व करण्याची इच्छा आहे का?या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शेतकरी आणि मराठा यांच्या जीवनात परिवर्तन करायचे असेल, लांबपर्यंत बोट चालवायची असेल, तर आपल्याला पोहायला आले पाहिजे. बोटला काही समस्या आली तर आपल्याला पोहता आले पाहिजे.”

हेही वाचा – Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी भाजपा आणि शिवसेनेत…, संजय राऊत यांचा आरोप

राज्य सरकार छगन भुजबळांना घाबरत नाही

जर ओबीसींसाठी काही करता आले नाही, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आधीच राजीनामा त्याला हवा होता. आता राजीनामा देऊन ओबीसी समाजावर उपकार करू लागला आहे का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “छगन भुजबळ हे राजकारणी आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा बांधवात तेढ निर्माण करू लागले आहे. राज्य सरकार छगन भुजबळांना घाबरत नाही”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -