घरताज्या घडामोडीMaratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सुनावणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सुनावणी

Subscribe

मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमके काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मराठा आरक्षणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी

मराठा आरक्षणाची सुनावणी ही पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुणे होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर पुढील सुनावणी ही ५ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमके काय होणार हे पाहावे लागणार आहे.

काय आहे मराठा आरक्षण प्रकरण?

मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. हायकोर्टाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. दरम्यान, कोरोनामुळे सुप्रीम कोर्टातली सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत सुरत-नाशिक प्रवास आता दोन तासांत


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -