घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMaratha Reservation : मनोज जरांगे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम; म्हणाले- नाही तर...

Maratha Reservation : मनोज जरांगे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम; म्हणाले- नाही तर…

Subscribe

यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मागील साडेसहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. आपल्या नोंदी ओबीसीत निघाल्या. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झाला आहे. आपली मागणी आहे ओबीसीतून त्यांनी ते केलं नाही.

अंतरवाली सराटी (जालना) : राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्याचं विधेयक संमत केलं. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका जाहीर केली. आमच्या व्याख्येनुसारच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी नाही तर मराठा कुणबी हे एकच करणारा अध्यादेश काढावा अशी भूमिका त्यांनी यावेळी जाहीर केली. (Maratha Reservation Manoj Jarange insists on the demands of his colleagues Said if not)

यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मागील साडेसहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. आपल्या नोंदी ओबीसीत निघाल्या. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झाला आहे. आपली मागणी आहे ओबीसीतून त्यांनी ते केलं नाही. मराठा ओबीसीत जायाला पाहिजे तर मग पाहिजेत पुरावा. त्यासाठी नोंदी शोधल्या जात आहेत. कुणबी नोंदी सापडत आहेत. आता पुरावे सापडल्याने कुणबी आणि मराठी एकच आहेत की नाही मग. ही झाली एक बाजू. ज्यांना कुणबी घ्यायचं नाही. त्यांना मराठा म्हणून घ्यायचं, मग कालचं आरक्षण कोणाला दिलं? ज्यांना घ्यायचं नाही त्यांना दिलं मग आता कुणबी आणि मराठा एक करायला काय हरकत. ज्यांना घ्यायचं नाही त्यांना दहा टक्के दिलं. सगेसोयरे बाजुला ठेवा आता कुणबी मराठे एक करा. असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याची दोन दिवसांत अंमलबजावणी करा, आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. आमचंच आरक्षण आम्हाला द्या, समाजासाठी आजचा निर्णय महत्त्वाचा आहे. आजची बैठक तुमचं ऐकून निर्णय घेण्यासाठी आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Yugendra Pawar : आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण ? 

- Advertisement -

करोडो मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते. कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागलेत. जे रूसत होते, कुणबी नको म्हणून त्यांना काल कुणबी आरक्षण मिळाले, आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता मराठा-कुणबी सरसकट करायला काय हरकतय? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या शिवाय सरकारला सुट्टी नाही. कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा : Maratha Reservation : आरक्षण टिकले तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकते; महाराष्ट्राचा हाच आहे इतिहास

या मागण्यांवर जरांगे ठाम

राज्यातील मराठा समाजात पिढ्यांपिढ्या जिथे परंपरेनुसार, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सगळ्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मराठा आणि कुणबी एकच असा अद्यादेश काढावा, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावे आणि हैदराबादचे गॅझेट स्वीकारावे या मागण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -