घरमहाराष्ट्रManoj Jarange Patil: ...तर पश्चाताप करावा लागेल, जरांगे पाटील यांचा इशारा

Manoj Jarange Patil: …तर पश्चाताप करावा लागेल, जरांगे पाटील यांचा इशारा

Subscribe

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन करण्यात आलं. याआधी मराठा आरक्षणासाठी (maratha reservation)जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यभर फिरून मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान जागोजागी भव्य सभा घेतल्या जात असून ते जनतेशी संवाद साधत आहेत. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी विधीमंडळात केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचप्रामाणे 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर सरकारला पश्चाताप करावा लागेल, असं विधान जरांगे पाटील यांनी केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे.”

- Advertisement -

हेही वाचा… Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal : धनगर समाजाने भुजबळांना पाठिंबा देऊ नये, जरांगे पाटील यांचं आवाहन

“माझा मराठा समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकारवर बारकाईने लक्ष आहे. एकदा 24 डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे? हे त्यांना दाखवून देऊ. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांतते होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काही तरी कृती करू”, असेही जरांगे पाटली म्हणाले.

ओबिसी नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची इंदापूर येथे सभा पार पडणार आहे. त्या सभेबद्दल विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, की “त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. घटनात्मक पदावर बसले आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुऱ्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये.”

- Advertisement -

हेही वाचा… Bhujbal VS Jarange Patil : छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा, जरांगे पाटील यांची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबतची माहिती दिली. यात आंदोलकांपेक्षा पोलिसच अधिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ लाठीमार केला होता, असेही ते म्हणाले होते. याबाबतचा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले की, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय आणि महाराष्ट्र काय हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना पश्चाताप होईल.

“आम्ही मागेही दूध का दूध, पाणी का पाणी करू. दोन तीन दिवस वाट पाहू. फडणवीस यांना मराठे पुन्हा एकदा उघडे पाडणार, ते खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार. त्यांनी आम्हाला समजून घ्यावे. फडणवीस यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत? हे दाखवून देऊ”, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -