घरमहाराष्ट्रMaratha Reservation : ...अन् नवाब मलिक पुन्हा सत्ताधारी बाकांवर

Maratha Reservation : …अन् नवाब मलिक पुन्हा सत्ताधारी बाकांवर

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित आहेत. अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक देखील उपस्थित आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. असे असतानाही गेल्या अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र देखील लिहिलं होतं. या पात्राची चांगलीच चर्चा रंगली होती. असे असतानाही आजच्या या विशेष अधिवेशनात नवाब मलिक पुन्हा एकदा सत्ताधारी बाकावर बसले.

हेही वाचा – Mumbai Crime News : धक्कादायक ! मृतदेहासोबत कुटुंबाने हॉटेलमध्येच घालवले 10 दिवस

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी बसले, यावरून नवाब मलिक यांचा महायुतीला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं होतं, मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजितदादांना लिहिलेलं हे पत्र त्यावेळी शेअर देखील केलं आहे.

फडणवीसांच्या पत्रात काय?

सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारच आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही. असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे, परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : तुम्हाला वेगळी चूल मांडायची असेल तर जरूर मांडा पण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -